‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा महाअंतिम सोहळा येत्या ६ ऑक्टोबरला पार पडणार आहे. अभिजीत सावंत, जान्हवी किल्लेकर, सूरज चव्हाण, धनंजय पोवार, पंढरीनाथ कांबळे, वर्षा उसगांवकर, निक्की तांबोळी आणि अंकिता वालावलकर या आठ सदस्यांमधील एक जण यंदाच्या पर्वाचा विजेता होणार आहे. त्यामुळे सध्या ‘बिग बॉस मराठी’कडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. अशातच आजच्या भागात ‘बिग बॉस मराठी’च्या घरात गेल्या पर्वातील काही स्पर्धकांचा समावेश होणार आहे. कलर्स मराठीच्या सोशल मीडियावर या सदस्यांबद्दलचे काही खास प्रोमो शेअर करण्यात आले आहेत.
राखी सावंत, अभिजीत बिचुकले यांच्या पाठोपाठ आता घरात पत्रकार अनिल थत्ते यांचीही एन्ट्री होणार आहे. कलर्स मराठीने नुकताच अनिल यांच्या एन्ट्रीचा नवीन प्रोमो शेअर केला आहे. त्यांची ही डॅशिंग एन्ट्री सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. अनिल थत्ते यांची घरात एन्ट्री होताच त्या वर्षा यांना असं म्हणतात की, “मी तुम्हाला ताई म्हणणार नाही, कारण ती तरुणपणाची ड्रीमगर्ल आहे”. यापुढे ते निक्कीबद्दल असं म्हणतात की, “तू युनिक आहेस. तुझ्याशिवाय आम्ही ‘बिग बॉस’ची कल्पना करु शकत नाही”.
अनिल यांचा हा नवीन प्रोमो सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. त्यांनी ‘बिग बॉस’च्या पहिल्या पर्वात सहभाग घेतला होता. या स्पर्धकांमध्ये अनेक मराठी कलाकार होते पण एक चेहरा लक्षवेधी ठरला तो म्हणजे अनिल थत्ते यांचा. त्यांच्या आगळ्यावेगळ्या वेशभुषेमुळे अनिल थत्ते नेमके कोण आहेत? याबद्दल लोकांची उत्सुक्ता जागृत झाली. अनिल थत्ते त्यांच्या या हौशेला फक्त एकच कारण आहे ते म्हणजे लोकांनी त्यांच्याकडे पाहणे आणि हे ते स्वतःच कबुल करतात.
आणखी वाचा – मराठी मालिकेमध्ये इरीनाची एण्ट्री, प्रोमोमधील डायलॉगने वेधलं लक्ष, म्हणाली, “राम कृष्ण हरी”
अनिल थत्ते यांचे ज्योतिषीय विश्वात मोठे आहे पण फार कमी जणांना माहीत आहे की, अनिल हे याअगोदर पत्रकार होते. करिअरच्या सुरुवातीच्या काळात ते गगनभेदी नावाचे मराठी पब्लिकेशन चालवत असत. यात स्कँडलपासून ते अश्लील जोक्सपर्य़ंत सर्वकाही असत. त्यानंतर त्यांनी बिग बॉस मराठीमध्ये सहभाग घेतला आणि ते आणखी प्रसिद्धी झोतात आले. अशातच त्यांनी पुन्हा एकदा ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश केला आहे.