सोमवार, ऑगस्ट 31, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तुमची मुलगी प्लेन क्रॅशमध्ये…”, काजोलच्या मृत्यूची बातमी ऐकताच आईला बसला धक्का, प्रसंग सांगत म्हणाली…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 27, 2024 | 2:45 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Kajol Mother Stunned To Hear Her Fake Death News

काजोलच्या मृत्यूची बातमी ऐकताच आईला बसला धक्का

Kajol Mother Stunned To Hear Her Fake Death News : ‘दो पत्ती’ या थ्रिलर चित्रपटातील पाहुण्यांचे ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या नवीन भागात दणक्यात स्वागत करण्यात आले. काजोल देवगण, क्रिती सेनन, शाहीर शेख आणि कनिका धिल्लन यांनी मंचावर सहभाग घेतला. कपिलने पाहुण्यांसह काही मजेदार संवाद साधला. कपिलने काजोलला तिने स्वतःबद्दल ऐकलेल्या विचित्र अफवाबद्दल विचारले. काजोल म्हणाली, “मला स्वत: गुगलची गरज कधीच लागली नाही, कारण जर माझ्याबाबत विचित्र असेल तर लोक मला कॉल करतील किंवा मला मेसेज पाठवतील”.

जेव्हा कपिल शर्माने कोणती बातमी विचारली तेव्हा काजोल म्हणाली, “दर ५-१० वर्षांनी एक बातमी येते की, माझा मृत्यू झाला आहे. सोशल मीडियावर यापूर्वीही अनेकदा असे घडले आहे. एकदा कोणीतरी माझ्या आईला फोन करुन सांगितले की विमान अपघातात माझा मृत्यू झाला. त्या काळात सोशल मीडिया नव्हता त्यामुळे आईला मी फोन करेपर्यंत थांबावे लागले. हे अलीकडे अनेक वेळा घडले, मला वाटते की एक व्हिडीओ व्हायरल झालाय की माझा मृत्यू झाला आहे”.

आणखी वाचा – पाठकबाईंचं ‘झी मराठी’वर कमबॅक! ‘या’ नव्या मालिकेतून येणार प्रेक्षकांच्या भेटीस, प्रोमो पाहताच अभिनेत्रीवर कौतुकाचा वर्षाव

काजोलच्या या प्रसंगावर क्रितीने प्रतिक्रिया दिली आणि म्हणाली, “हे खूप वाईट आणि खूप भयानक आहे, असे कोणाबरोबरही होऊ नये”. याशिवाय एपिसोडमध्ये कपिलने गंमतीने विचारले, “काजोल मॅडम, तुम्ही आता पोलिसाची भूमिका साकारत असल्याने अजय सरांनी तुम्हाला ‘आता माझी सटकली’ म्हणायला शिकवले का?, यावर काजोलने उत्तर दिले की, तिने पती अजयचा कोणताही सल्ला घेतला नाही आणि कारण विचारले असता, तिचे उत्तर मजेदार उत्तरही दिले.

आणखी वाचा – लीलाची सासूगिरी सुरु! नव्या अवताराने मिळणार सूनांना धक्का, प्रोमो पाहून नेटकरीही खुश, म्हणाले, “ज्या गोष्टीची…”

ती गंमतीने म्हणाली की, तुम्ही ही गोष्ट विसरालत का की, मीच त्याला सिंघमसाठी प्रशिक्षण दिले होते. अभिनेत्रीने अशीही माहिती दिली की, तिने ‘सिंघम’साठी अजयला मराठी भाषा शिकण्यासाठी मदत केली होती. या व्यतिरिक्त काजोल व क्रिती यांनी ‘दिलवाले’च्या दिवसापासून ते किती बदलले आहेत याबद्दल भाष्य केलं. जिथे जवळजवळ ८ वर्षांपूर्वी दोघे पहिल्यांदा पडद्यावर एकत्र दिसले होते आणि त्यांनी चित्रपटात बहिणींची भूमिका केली होती. दोघांनी एकमेकांबद्दलचे अनेक रंजक किस्से शेअर केले.

Tags: actress kajolbollywood newsKajol Mother Stunned To Hear Her Fake Death News
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
Telugu actor GV Narayana Rao Death
Entertainment

ज्येष्ठ तेलुगू अभिनेते वयाच्या ७३ व्या वर्षी काळाच्या पडद्याआड, चिरंजीवींनी वाहिली श्रद्धांजली

ऑगस्ट 28, 2026 | 10:35 am
Kapuskonda Movie
Entertainment

‘कापूसकोंडा’मुळे सचिन पिळगावकर, मधुराणी गोखले पुन्हा एकत्र, २३ ऑक्टोबरला सिनेमागृहात

ऑगस्ट 28, 2026 | 10:02 am
Bandhu Marathi Movie
Entertainment

राम-लक्ष्मणाच्या अतूट बंधाची आठवण करून देणारा ‘बंधू’, उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी पहिल्यांदा एकत्र

ऑगस्ट 27, 2026 | 3:07 pm
Next Post
Sonali Bendre Orry Viral Video

Video : सोनाली बेंद्रे व ओरीने उडवली जया बच्चनची खिल्ली, व्हिडीओ शेअर करताच सगळे पाहतच राहिले अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.