शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मालिकेत काम करणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा शाही विवाह सोहळा, कलाकारांची गर्दी, पहिला फोटो समोर

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑक्टोबर 28, 2024 | 12:14 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
surbhi jyoti wedding

अभिनेत्री सुरभी ज्योती अडकली लग्नबंधनात

टेलिव्हिजनवरील ‘कुबुल है’ या मालिकेतील सुरभी ज्योति ही अभिनेत्री घराघरात पोहोचली. ती नंतर अनेक मालिका व कार्यक्रमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसून आली. अशातच आता अभिनेत्री लग्नबंधनात अडकली आहे. सुरभीने  बॉयफ्रेंड सुमित सुरीबरोबर लग्नगाठ बांधली आहे. सुरभीच्या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झालेले दडिसून येत आहेत. याआधी त्यांच्या हळदी ब मेहंदी समारंभाचे फोटोदेखील समोर आले आहेत. यामध्ये त्यांचे मित्रमंडळी तसेच कुटुंबातील सदस्य सामील झालेले दिसून येत आहेत. त्यामुळे आता सुरभीनेही आयुष्याची नवीन सुरुवात करत चाहत्यांना एक सुखद धक्का दिला आहे. तिने स्वतःच्या सोशल मीडियावर फोटो शेअर करत याबद्दलची कल्पना दिली आहे. (surbhi jyoti wedding)

लग्नानंतर सुरभीने सुमितबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत/ तसेच हे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “शुभ विवाह”. तिच्या या पोस्टवर टेलिव्हिजन  क्षेत्रातील अनेक कलाकारांनी पसंती दर्शवली असून प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत. लग्नाच्या वेळी सुरभीने लाल व पिवळ्या रंगाचा लहंगा परिधान केला होता. तसेच हातातील कलिरे, लाल चुडा. डोक्यावरील मांग टीका यामध्ये नवरीच्या वेशात सुरभी खूप सुंदर दिसत आहे. तसेच सुमितने पांढऱ्या रंगाची शेरवानी परिधान केली आहे. दोघंही एकत्रित खूप सुंदर दिसत आहेत.

आणखी वाचा – “ठाणे महानगरपालिका झोपेच्या शोधात”, कचरा प्रकरणी शशांक केतकरची पुन्हा एकदा पोस्ट, सत्य परिस्थिती दाखवत म्हणाला, “देश असाच घाण…”  

View this post on Instagram

A post shared by Surbhi Jyoti (@surbhijyoti)

मिळालेल्या माहितीनुसार, सुरभी व सुमित मार्च महिन्यात राजस्थान येथे लग्न करणार होते. मात्र ठिकाण निश्चित होत नसल्याने लग्न पुढे ढकलले गेले. त्यानंतर त्यांनी उत्तराखंड येथील जिम कॉर्बेटची निवड केली. समोर आलेल्या फोटोंमध्ये एका मोठ्या झाडाला सुंदररित्या सजवले गेलेले दिसून येत आहे. या झाडाखालीच सुरभी व सुमित यांनी सात फेरे घेतले.

आणखी वाचा – “तुमची मुलगी प्लेन क्रॅशमध्ये…”, काजोलच्या मृत्यूची बातमी ऐकताच आईला बसला धक्का, प्रसंग सांगत म्हणाली…

लग्नाआधी 27 तारखेला दुपारी दोघांचा हळदी समारंभ पार पडला. याआधी शनिवारी त्यांचा मेहंदी समारंभ पार पडला यामध्ये सुरभीने पंजाबी पेहराव परिधा केला होता. दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, सुरभी व सुमितची ओळख २०१९ साली झाली. त्यांच्यामध्ये मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.     

Tags: qubool haisurbhi jyotiwedding
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Tharla Tar Mag serial fame actress Jui Gadkari shared a special video of her visit to an orphanage in Shantivan see the details

Video : अनाथ, वृद्धांसाठी जुई गडकरीचा मदतीचा हात, शेअर केला खास व्हिडीओ, कौतुकाचा वर्षाव

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.