टेलिव्हीजनवरील ‘शक्तिमान’ ही मालिका आज इतके वर्ष झाली तरीही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या मालिकेने सगळ्यांचेच मनोरंजन केले आहे. या मालिकेमध्ये मुकेश खन्ना हे मुख्य भूमिकेमध्ये होते. आता ते अभिनयापासून दूर असलेलेदेखील दिसून येत आहेत. मात्र ते सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. ते अनेकदा त्यांचे परखड मतदेखील मांडत असतात. तसेच जी गोष्ट पटत नाही त्यावर ते टीकादेखील करतात. आता त्यांनी बॉलिवूड अभिनेत्यांवर निशाणा साधला आहे. ज्यामुळे त्यांच्याबद्दल पुन्हा एकदा वक्तव्य करुन चर्चेत आले आहेत. (mukesh khanna on bollywood actors)
मुकेश यांनी आता जाहिरातींमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्यांना लक्ष्य केले आहे. पान मसाला, रमी अशा अनेक जाहिराती करणाऱ्या अभिनेत्यांवर त्यांनी भाष्य केले आहे. यामध्ये अजय देवगण, अक्षय कुमार, महेश मांजरेकर या कलाकारांवर टीका केली आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी लिहिले की, “जाहिरातीची दुनिया आता पैशांची दुनिया झाली आहे का? पैसा फेका तमाशा बघा. हा खरंच आधार झाला आहे का? पैसे द्या आणि काहीही बोलून घ्या. मॉडेल्स, अभिनेते यांचा पैसे कमावण्याचा फक्त एकच हेतु राहिला आहे का?”.
पुढे त्यांनी लिहिले की, “त्यांचा आत्मसन्मान, समाजाशी असलेलं त्यांचं नातं, तरूणांसमोर सगळं नगण्य झालं आहे. कोणतही उत्पादन कितीही वाईट असलं तरीही चांगलं बोललं पाहिजे हा जणू त्यांचा धर्मच झाला आहे. कारण या कामासाठी त्यांना पैसे मिळत आहेत. पैसा पैसा पैसा!!! किती कमवाल पैसा? गरजेपेक्षा जास्त असूनपण पैसे हवे आहेत यांना”. त्यांनी नंतर लिहिले की, “हो मी मोठ्या कलाकारांबद्दलच बोलत आहे. जाहिरात बनवणारे मदारी झाले आणि कलाकार माकड बनून डमरुवर नाचत आहेत”.
पुढे त्यांनी लिहिले की, “केशर असो, जंगली रमी असो किंवा दारु सिगरेट का असेना. कुठल्याची उत्पादनाची विश्वासनियता न बघता काहीही का बोलत आहेत? कारण त्यांना खूप सारे पैसे मिळत आहेत त्यामुळे ते अशा जाहिराती करत आहेत. समाज, युवावर्ग, तब्येत तसेच लोकांच्या मनावर किती वाईट परिणाम होत असेल याचा विचार कोणीही करत नाही. सरकार, पोलिस, सोशल मीडिया चालवणारे प्लॅटफॉर्म देखील याचा विचार करत नाहीत. ही घाण कधी संपणार? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही घाण कोण थांबवणार?”. दरम्यान या पोस्टकडे सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे.