शनिवार, जून 13, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : कॅप्टनसीमुळे अरबाज सुरक्षित, आता नक्की घराबाहेर कोण जाणार?, वेगवेगळ्या नावांची चर्चा

Saurabh Moreby Saurabh More
सप्टेंबर 21, 2024 | 11:38 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 daily updates Nikki Tamboli, Janhavi Killekar, Suraj Chavan and Varsha Usgaonkar nominated to leave the house

Bigg Boss Marathi 5 मधील निक्की, जान्हवी, सूरज आणि वर्षा हे सदस्य नॉमिनेट, कोण जाणार घराबाहेर?

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाला सुरु होऊन आता जवळपास ५० दिवस पूर्ण झाले आहेत आणि या घरातील खेळ आता आणखीनच रोमांचक होत चालला आहे. आठवा आठवडा सुरु होताच आता ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील स्पर्धा दिवसेंदिवस कठीण होत चालली आहे. आठव्या आठवड्याच्या सुरुवातीलाच घरात नॉमिनेशन टास्क पार पडला. आठवड्याच्या थीमनुसार घरात पहिल्याच दिवशी ‘शिकाऱ्याची बंदूक’ हे नॉमिनेशन कार्य पार पडलं. ‘बिग बॉस’ने दोन गटांत घरातील सदस्यांची विभागणी केली. एका टीममध्ये निक्की, अरबाज, सूरज, वर्षा आणि जान्हवी हे पाच सदस्य होते. तर, दुसऱ्या टीममध्ये अभिजीत, अंकिता, धनंजय, पॅडी आणि संग्राम हे पाच जण होते. (Bigg Boss Marathi 5 daily updates)

या टास्कमध्ये निक्की व अंकिताची जोडी पाठवण्यात आली. यामध्ये निक्कीने बाजी मारली. दुसऱ्या फेरीत वर्षा व धनंजय या सदस्यांपैकी डीपीने बंदूक मिळवली. यानंतर अरबाज व पॅडीच्या तिसऱ्या फेरीत अरबाजने बाजी मारली आणि बंदूक मिळवली. त्यानंतर जान्हवी व अभिजीत या जोडीत अभिजीतने चपळता दाखवत लगेच बंदूक उचलली. तर, दुसरीकडे पळत येणाऱ्या जान्हवीचा पाय घसरल्याने तिच्या पायाला दुखापत झाली. मग अखेरच्या फेरीत सूरज व संग्राम या जोडीचा सामना रंगला. पण यावेळी संग्रामच्या शक्तीपुढे सूरजची ताकद कमी पडली. त्यामुळे त्याने हा सामना जिंकत आपल्या टीमला इम्युनिटी मिळवून दिली आहे.

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

आणखी वाचा – Video : हिंदी Bigg Boss मध्येही सुप्रसिद्ध अभिनेत्रीने निक्कीला मारलेली कानाखाली, हाणामारीचा ‘तो’ व्हिडीओ तुफान व्हायरल

या नॉमिनेशनच्या टास्कच्या नियमानुसार कमी पॉईंट्स मिळाल्याने टीम A थेट नॉमिनेट होते. यात निक्की, अरबाज, जान्हवी, वर्षा आणि सूरज या पाच सदस्यांचा समावेश होता. हे पांच सदस्य थेट नॉमिनेशन प्रक्रियेत होते. पण शुक्रवारी झालेल्या भागात अरबाज कॅप्टन झाला आहे. त्यामुळे या आठवड्यातील घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेतून अरबाज सुरक्षित झाला आहे. त्यामुळे आता घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेत जान्हवी, सूरज, वर्षा व निक्की या चार सदस्यांचा समावेश आहे.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “फक्त बहुमतासाठी मला वापरलंत आणि…”, बी टीमवर वर्षा उसगांवकरांचा पलटवार, निक्की-अरबाज यांची बाजू घेत म्हणाल्या…

त्यामुळे आता बिग बॉस मराठीच्या घराबाहेर कोण जाणार? याबद्दल अनेक चर्चा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. सूरजला जनतेचा पूर्ण पाठींबा आहे. याशिवाय जान्हवी व निक्की यांनी प्रत्येक कार्यात पूर्णपणे मेहनत घेत टास्क जिंकले आहेत. त्यामुळे राहिल्या वर्षा उसगांवकर. त्यांनी या आठवड्यात सक्षम कामगिरी केल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे आता या आठवड्यात नक्की कोण घराबाहेर जाणार? याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे.  

Tags: janhavi killekarnikki tamboliSuraj Chavanvarsha usgaonkar
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

krishnai chya leki serial
Entertainment

संगममाऊली घाटावर रंगला ‘कृष्णाईच्या लेकी’चा आगळावेगळा शुभारंभ, नव्या मालिकेची उत्सुकता

जून 12, 2026 | 4:40 pm
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
Entertainment

‘तारक मेहता…’च्या पोपटलालचं खऱ्या आयुष्यात झालंय लग्न, कुटुंबांच्या विरोधात जाऊन केलाय प्रेमविवाह

जून 12, 2026 | 10:19 am
rs 370 biryani controversy
Entertainment

‘३७० रुपयांची बिर्याणी’ प्रकरण पडलं महागात, कॉमेडियन प्रणित मोरेला राष्ट्रीय महिला आयोगाकडून नोटीस, प्रकरण काय?

जून 12, 2026 | 9:58 am
Arjun Rampal interview
Entertainment

२० वर्षांचा संसार मोडला, आईचं कॅन्सरने निधन आणि…; सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने सांगितला आयुष्यातील कठीण काळ, म्हणाला…

जून 10, 2026 | 11:50 am
Next Post
Anshuman Vichare New Video

लवकरच नव्या घरात राहायला जाणार अंशुमन विचारे, पहिल्यांदाच दाखवले inside photo , व्हिडीओ समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.