गुरूवार, मे 22, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लोकप्रिय मालिका ‘बडे अच्छे लगते है’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला, १० वर्षानंतर राम-प्रिया ही जोडी दिसणार, उत्सुकता शिगेला

Majja Webdeskby Majja Webdesk
नोव्हेंबर 2, 2024 | 10:55 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
bade acche lagte hain serial update

लोकप्रिय मालिका 'बडे अच्छे लगते है' पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

टेलिव्हिजनवरील आवडती मालिका ‘बडे अच्छे लगते है’ ही आजही प्रेक्षकांच्या खूप लक्षात आहे. अभिनेता राम कपूर व अभिनेत्री साक्षी तन्वर यांची मुख्य भूमिका असणाऱ्या मालिकेला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. २०११ ते २०१४ या कालावधीमध्ये ही मालिका प्रदर्शित व्हायची. मात्र ही मालिका लवकर संपल्याने प्रेक्षकांचा मात्र चांगलाच हिरमोड झाला होता. अशातच आता या मालिकेबद्दलची नवीन अपडेट समोर येत आहे. १० वर्षानंतर ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ११ नोव्हेंबरपासून ‘बडे अच्छे…’ मालिका पुन्हा बघता येणार आहे. सोनी टीव्हीने अधिकृत सोशल मीडिया हँडलवरुन मालिकेचा प्रोमो प्रदर्शित केला आहे. यामध्ये मालिकेबद्दल घोषणा करण्यात आली आहे. (bade acche lagte hain serial update)

लोकप्रिय मालिका ‘बडे अच्छे…’ प्रोमो समोर आला असून यामध्ये राम व साक्षी दिसून येत आहेत. यामध्ये दोघंही समान खरेदी करत आहेत तर एकमेकांबरोबर बोलतानादेखील दिसत आहेत. तसेच हा प्रोमो शेअर करत लिहिले आहे की, “पुन्हा एकदा तुमच्या आवडत्या जोडीला भेटा. बघा #बडेअच्छेलगतेहै, ११ नोव्हेंबरपासून रात्री ८.३० वाजता, फक्त #सोनीएंटरटनमेंटटेलिव्हिजवर”. हा प्रोमो समोर येताच नेटकऱ्यांनी प्रतिरकिया देण्यास सुरुवात केली असून प्रेम दर्शवले आहे.

आणखी वाचा – Singham Again Review : ‘सिंघम अगेन’ चित्रपट पाहावा की नाही? पहिला रिव्ह्यू समोर, प्रेक्षकांच्या वेगळ्याच प्रतिक्रिया

View this post on Instagram

A post shared by Sony Entertainment Television (@sonytvofficial)

एकता कपूर निर्मित ‘बडे अच्छे…’ मालिकेचा खूप मोठा चाहतावर्ग होता. हटके कथेने सगळ्यांचेच लक्ष वेधले. प्रिया शर्मा व राम कपूर यांच्याबद्दलची ही गोष्ट असून प्रेक्षकांना खिळवून ठेवते. सुरवातीला एकमेकांचा तिरस्कार करणारे लग्नानंतर त्यांच्यामधील प्रेम कसं वाढत जातं? याबद्दल दाखवण्यात आले आहे.

आणखी वाचा – लग्नाच्या पाच वर्षांनंतर नेहा गद्रे आई होणार, थाटामाटात पार पडला डोहाळे जेवणाचा कार्यक्रम, बाळाच्या जन्माआधी केलं जेंडर रिव्हिल

या मालिकेमध्ये सुमोना चक्रवर्ती, मोहित मल्होत्रा, चाहत खन्ना, ईवा ग्रोव्हर, जय कालरा असे अनेक कलाकार होते. ११ नोव्हेंबर पासून ही मालिका रात्री ८.३० वाजता पुन्हा एकदा भेटीस येणार आहे. २०२१ साली देखील ‘बडे अच्छे लगते है २’ ची घोषणा करण्यात आली होती. दुसऱ्या भागांमध्ये नकुल मेहता व दिशा परमार मुख्य भूमिकेत होते. तसेच २०२३ साली तिसरा भागदेखी प्रदर्शित करण्यात आला होता. मात्र जास्त काळ सुरू राहू शकला नाही.

Tags: bade acche lagte hainHindi serialTelevision
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bigg Boss 19
Entertainment

अखेर ठरलं! ‘बिग बॉस १९’ लवकरच सुरु होणार, सलमान खान सुत्रसंचालन करणार का?, स्पर्धक कोण असणार?

मे 22, 2025 | 1:05 pm
Mumbai rain viral video
Entertainment

“पहिल्याच पावसात BMCची लायकी कळाली”, रस्त्यावरील कचरा पाहून भडकला मराठी अभिनेता, भयावह व्हिडीओ समोर

मे 22, 2025 | 12:51 pm
 Kartiki Gaikwad Brother Haldi Ceremony
Entertainment

करवलीचा नखरा! भावाच्या लग्नात कार्तिकी गायकवाडचीच हवा, हळदीच्या ड्रेसपुढे नवरीही फिकी

मे 22, 2025 | 12:13 pm
dipika kakar health update
Entertainment

१०४ ताप, शुद्धही हरपली, सर्जरीला जाणार पण…; दीपिका कक्करला प्रत्यक्षात मरण यातना, नवरा शोएबने सांगितली सत्य परिस्थिती

मे 22, 2025 | 11:54 am
Next Post
Amruta Khanvilkar New Home

अमृता खानविलकरने मुंबईत खरेदी केलं आलिशान घर, दिवाळीनिमित्त दाखवली घराची झलक, कलाकारांकडून कौतुक अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.