शुक्रवार, एप्रिल 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अखेर ठरलं! ‘बिग बॉस १९’ लवकरच सुरु होणार, सलमान खान सुत्रसंचालन करणार का?, स्पर्धक कोण असणार?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 22, 2025 | 1:05 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Bigg Boss 19

अखेर ठरलं! 'बिग बॉस १९' लवकरच सुरु होणार, सलमान खान सुत्रसंचालन करणार का?, स्पर्धक कोण असणार?

Bigg Boss 19 : ‘बिग बॉस’ या रिऍलिटी शोचा जगभरात खूप मोठा चाहतावर्ग आहे. या रिऍलिटी शोबाबत जाणून घ्यायला चाहतेमंडळी नेहमीच उत्सुक असतात. या शोमधूला एखाद्या स्पर्धकाचे आयुष्य चमकते तर एखाद्याच्या आयुष्यात काहीच बदल होत नाही. या शोच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी आजवर अभिनेता सलमान खान याने सांभाळली आहे. ‘बिग बॉस’ १८ संपून आता बरेच दिवस झाले आहेत, त्यामुळे या शोच्या आगामी सिझनची चाहत्यावर्गात उत्सुकता लागून राहिलेली पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस १९’ केव्हा येणार याकडे अनेकांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. अशातच हा शो सुरु असलेल्या चॅनेलबाबत मध्यंतरी कुजबुज कानावर आली.

बनिजय एशिया (एंडेमोल शाइन इंडिया) हे निर्मिती करणार प्रॉडक्शन हाऊस कलर्स टीव्हीपासून वेगळं होणार आहे. हे प्रॉडक्शन हाऊस बर्‍याच वर्षांपासून बिग बॉसचे घर आहे. या बातमीने ‘बिग बॉस’ आणि ‘खतरों के खिलाडी’ या दोन्ही शोच्या प्रेक्षकांना भरपूर वाट पाहायला लावली. पण आता एक चांगली बातमी समोर आली आहे. पिंकविलाने या शोबाबतचा मोठा खुलासा केला आहे. ‘बिग बॉस १९’ लवकरच सुरु होणार आहे आणि याची निर्मिती ‘एंडेमोल शाईन इंडिया’द्वारे केली जाईल. हा शो प्रेक्षकांना पाहायला आवडणारी सर्व नाटक, आव्हाने आणि करमणूक आणण्याचे वचन देतो.

आणखी वाचा – प्रेमविवाह करण्याची चूक, नणंदेने संशय घेतला अन्…; मृत्यूपूर्वी वैष्णवी हगवणेने मैत्रिणीला काय काय सांगितलं?, घटस्फोट घेईन म्हणत…

सूत्रसंचालकच्या भूमिकेत कोण दिसणार?
त्याहूनही अधिक रोमांचक म्हणजे बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान सूत्रसंचालक म्हणून यंदाच्या ‘बिग बॉस १९’ची बाजू सांभाळणार आहेत. बर्‍याचदा ऐकायला मिळाले आहे की, सलमान खान हा शो सोडत आहे. परंतु त्याचे व्यस्त वेळापत्रक असूनही, ५९ वर्षीय भाईजान प्रेक्षकांच्या प्रेमापोटी हा शो पुन्हा एकदा होस्ट करण्यास तयार झाला आहे.

आणखी वाचा – करवलीचा नखरा! भावाच्या लग्नात कार्तिकी गायकवाडचीच हवा, हळदीच्या ड्रेसपुढे नवरीही फिकी

जूनमध्ये प्रोमो, जुलैमध्ये प्रीमियर
‘बिग बॉस १९’ चा पहिला प्रोमो जूनच्या अखेरीस शूट केला जाईल. नवीन हंगामाचा प्रीमियर जुलैच्या उत्तरार्धात असणे अपेक्षित आहे. सलमान खानचा बिग बॉसशी सखोल संबंध आहे आणि जेव्हा तो शोचे आयोजन १९ व्या वेळा करणार आहे.

स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

 divyanka sirohi death reason
Entertainment

सुप्रसिद्ध पंजाबी अभिनेत्रीचे वयाच्या ३०व्या वर्षी निधन, घरीच मृतावस्थेत आढळली, मृत्यूचे कारण…

एप्रिल 23, 2026 | 3:00 pm
veen doghatli hi tutena serial
Entertainment

भयंकर ऊन, घामाच्या धारा अन्…; ‘वीण दोघांतली…’च्या कलाकारांनी ४५ मिनिटांत पूर्ण केलं शूट, बहरणार रोमान्स

एप्रिल 22, 2026 | 2:50 pm
Puja Banerjee pregnant
Entertainment

टेलिव्हिजनची ‘पार्वती’ दुस-यांदा प्रेग्नंट, पळून जाऊन वयाच्या १५व्या वर्षी केलेलं लग्न, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

एप्रिल 22, 2026 | 1:00 pm
Aishwarya Rai updates
Entertainment

“आई ती शेवटी आईच”, एअरपोर्टवर लेकीला घ्यायला पोहोचले ऐश्वर्या-अभिषेक, आराध्याचे फोटोही काढले आणि….

एप्रिल 22, 2026 | 11:00 am
Next Post
Sharad Ponkshe On Trolling

कर्ज काढलं, फ्लॅट विकला अन्…; मुलीला पायलट बनवण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांना शरद पोंक्षेंचं थेट उत्तर, घर चालवायलाही पैसे नसताना…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.