Shalin Bhanot Angry On Dating Rumours : टेलिव्हिजनवरील लोकप्रिय रिॲलिटी शो ‘बिग बॉस’ हा वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाचं हे ‘बिग बॉस’चं पर्व विशेष गाजताना दिसत आहे. यंदाच्या पर्वात नुकतंच फॅमिली वीक स्पेशलमध्ये स्पर्धकांच्या कुटुंबीयांना बोलावण्यात आले होते. चाहत पांडेच्या आईपासून रजत दलालच्या आईपर्यंत काही सदस्यांची चांगलीच शाळा घेतलेली पाहायला मिळाली. सध्या अभिनेत्री ईशा सिंहचे नाव शालिन भानोतसह जोडले जात आहे. ईशा व शालीनने एका मालिकेत एकत्र काम केले आहे. डेटिंगच्या अफवांमुळे पहिल्यांदाच अभिनेत्याने या चर्चांवर मौन सोडले आहे. सलमान खानने वीकेंड का वार एपिसोडमध्ये शालीनला फोन करुन ईशाला छेडले होते. यानंतर भाईजानने शालिन भानोतकडे बोट दाखवल्याचे चाहत्यांना समजले.
शालिन आणि ईशा दोघेही एकमेकांना चांगले मित्र म्हणतात. चाहत पांडेच्या आईनेही सांगितले होते की, ईशा व शालीनच्या घराबाहेरील रील व्हायरल होत आहेत. करणवीर मेहरानेही ईशाला शालिनबद्दल विचारले होते. इतकंच नाही तर अविनाशलाही याचं आश्चर्य वाटलं. या सर्व संभाषनानंतर शालिन भानोतने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये प्रथमच स्वत: अभिनेत्याने ईशा सिंगबरोबरच्या अफेअरच्या अफवांवर प्रतिक्रिया दिली आहे.
शालिन म्हणाला, “माझ्याबद्दल बरेच लोक बोलत आहेत. तुम्ही माझ्याबद्दल काहीही बोलू शकता, कारण मला ते आवडते, परंतु माझे नाव घेऊन कोणत्याही मुलीच्या चारित्र्यावर किंवा सन्मानावर प्रश्नचिन्ह निर्माण करणे चुकीचे आहे. हे मला अजिबात योग्य वाटले नाही. त्यामुळे तुम्ही सर्वांनी हे करणे बंद करा. कृपया अशा अफवा वाढवण्याचे काम करु नका”. शालिन भानोत पहिल्यांदाच ईशा सिंगबद्दल बोलला. त्यामुळेच त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चाहत्यांनीही त्याच्या मुद्द्याला पाठिंबा दिला आहे.
आणखी वाचा – अभिषेक-ऐश्वर्या पुन्हा दिसले एकत्र, नव्या वर्षाचे सेलिब्रेशन करुन भारतात परतले, ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष
शालिनबद्दल सांगायचे तर तो ‘बिग बॉस १६’ चा भाग राहिला आहे. गेल्या वर्षी त्याने ‘खतरों के खिलाडी १४’ मध्येही भाग घेतला होता. याशिवाय शालिन आणि ईशा यांनी ‘बेकाबू’मध्ये एकत्र काम केले होते. ‘बिग बॉस’च्या घरात अविनाश मिश्रा आणि ईशा सिंग यांच्यातील नात्यालाही खूप पसंती दिली जात आहे. अविनाश आणि ईशा अनेकदा एकमेकांची खिल्ली उडवताना दिसतात. एकेकाळी सलमाननेही त्यांच्या नात्यावर प्रश्न उपस्थित केले होते.