गुरूवार, एप्रिल 16, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

कॅन्सरच्या उपचारादरम्यान पडद्यावर परतली हिना खान, ‘गृहलक्ष्मी’ बनून मनं जिंकणार, चाहत्यांमध्ये आनंदाच वातावरण

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 4, 2025 | 10:59 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Hina Khan New Show

कॅन्सरच्या उपचारादरम्यान पडद्यावर परतली हिना खान, 'गृहलक्ष्मी' बनून चाहत्यांची मनं जिंकणार, चाहत्यांमध्ये आनंदाच वातावरण

Hina Khan New Show : प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री हिना खान स्टेज ३ ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देत आहे. अभिनेत्रीवर सध्या उपचार सुरु आहेत आणि दरम्यान ती बऱ्याच दिवसांनी पडद्यावर परतण्यासाठी सज्ज झाली आहे. अभिनेत्रीने तिचा नवीन शो जाहीर केला असून तिचा हा शो जानेवारीमध्येच पडद्यावर येण्यासाठी सज्ज असल्याचंही समोर आलं आहे. हिना खानने तिच्या इंस्टाग्रामवर तिचा नवीन थ्रिलर शो ‘गृहलक्ष्मी’चा टीझर शेअर केला आहे. अभिनेत्रीने शेअर केलेल्या या टीझरमध्ये गुलाबी साडी नेसलेली, मोकळे केस आणि तीक्ष्ण वृत्ती असलेल्या हिना खानचा यापूर्वी कधीही न पाहिलेला अवतार समोर आला आहे.

टिझरसह कॅप्शनमध्ये अभिनेत्रीने शोची स्टोरी आणि प्रदर्शनाची तारीखही उघड केली आहे. टीझर शेअर करताना, हिना खानने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “‘गृहलक्ष्मी’च्या अप्रतिम कलाकारांना भेटा, बेतालगडच्या हृदयातील प्रेम, विश्वासघात आणि जगण्याची एक मनोरंजक कथा आहे कारण ही कथा धोका आणि अडचणींनी भरलेल्या जगात प्रवेश करते. ती तिचे कुटुंब, तिचे साम्राज्य आणि स्वतःचे संरक्षण करण्यासाठी लढते. हे मनोरंजक नाटक चुकवू नका! १६ जानेवारी रोजी फक्त EPIC ON वर प्रवाहित केले जाईल”.

आणखी वाचा – अमिताभ बच्चन यांच्याबरोबर विमानतळावरुन येताना जया बच्चन भडकल्या, बोट दाखवत कर्मचाऱ्यांना खडसावले, नेटकरी भडकले

View this post on Instagram

A post shared by ???????????????? ???????????????? (@realhinakhan)

‘गृहलक्ष्मी’मध्ये हिना खान लक्ष्मीच्या भूमिकेत दिसणार आहे. या शोमध्ये चंकी पांडे, राहुल देव आणि दिव्येंदू भट्टाचार्य देखील दिसणार आहेत. चंकी पांडे काझीच्या भूमिकेत, राहुल देव पोलिसाच्या भूमिकेत आणि दिव्येंदू विक्रमच्या भूमिकेत दिसणार आहे. याआधी हिना खानने ‘हॅक व डॅमेज’ सारख्या चित्रपटात काम केले आहे.

आणखी वाचा – घटस्फोटांच्या चर्चांदरम्यान अभिषेक-ऐश्वर्या पुन्हा एकत्र, नव्या वर्षाचे सेलिब्रेशन करुन भारतात परतले, अभिनेत्याच्या ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष

मात्र अभिनेत्रीला खरी ओळख मिळाली ती स्टार प्लसवरील ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेमधून. या शोमधून ती अक्षरा या नावाने घराघरात ओळखली जाऊ लागली. याशिवाय ती ‘बिग बॉस ११’ ची फर्स्ट रनर अप होती. सध्या हिना कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराचा सामना करत आहे. या आजाराशी लढा देत ती बरी होताना दिसत आहे. इतकंच नाही तर केमोथेरपीनंतर अभिनेत्री कामावर परततानाही दिसत आहे.

Tags: hina khanHina Khan New Showtelevision actress
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Akshay Kumar fitness :
Lifestyle

‘या’ बॉलिवूड अभिनेत्याने १५ वर्षांपासून खाल्ला नाहीय समोसा, वयाच्या ५९ व्या वर्षी आहे इतका फिट, कारण आहे…

एप्रिल 16, 2026 | 11:00 am
Reasons For Sugar Cravings 
Lifestyle

जेवणानंतर आपल्याला मिठाई का हवी असते?, आयुर्वेदात दडलंय याचं रहस्य, वाचा सविस्तर

एप्रिल 16, 2026 | 10:10 am
Rakhi Sawant and Raqesh Bapat bonding
Entertainment

“मला माझा संसार हवाय”, राकेश बापटच्या एकतर्फी प्रेमात आहे राखी, म्हणाली, “मी बॉलिवूड सोडेन”

एप्रिल 15, 2026 | 4:38 pm
Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Next Post
Abhijeet Bhattacharya On Ranbir Kapoor

"गोमांस खाणाऱ्याला राम मंदिरात का बोलवता?", सुप्रसिद्ध गायकाची रणबीर कपूरवर टीका, म्हणाला, “गाईला…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.