सध्या मालिका विश्वामध्ये अनेक नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येतात. ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील अनेक मालिकांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. ही वाहिनी याने आशयघन मालिकांची निर्मिती करते. तसेच या वाहिनीवरील अनेक कार्यक्रमदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस पडले आहेत. कौटुंबिक, अध्यात्म, विनोदी असे अनेक आशय असलेल्या मालिका पाहायला मिळतात. अशातच आता एक नवीन मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही मालिका आध्यात्मिक स्वरुपाची असून यामुळे मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. (aai tulja bhavani serial)
‘कलर्स मराठी’वर आतामहाराष्ट्राची कुलस्वामिनी ‘आई तुळजाभवानी’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेची पहिली झलक काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या समोर आली होती. हे प्रेक्षकांना खूप पसंत पडले होते. मात्र या मालिकेत मुख्य भूमिका कोण साकारणार? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. अशातच आता या मालिकेचा प्रोमो समोर आला आहे. यामध्ये प्रमुख भूमिका कोण साकारणार हे समोर आले आहे.
‘आई तुळजाभवानी’ मालिकेचा प्रोमो वाहिनीच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.हा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, “अधर्मांचा विनाश आणि भक्तांच्या रक्षणासाठी, धरतीवर अवतरली अष्टभुजा आई तुळजाभवानी! अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी, ‘आई तुळजाभवानी’, लवकरच आपल्या कलर्स मराठीवर. असं लिहिलं आहे.
या मालिकेमध्ये मुख्य भूमिका अभिनेत्री पूजा काळेने साकारली आहे. पूजा ही भरतनाट्यम डान्सर आहे. तसेच तिने कथ्थकचेदेखील शिक्षण घेतले आहे.या मालिकेच्या निमित्ताने पूजा मालिकाविश्वात पदार्पण करणार आहे. दरम्यान ही मालिका कधी सुरु होणार? याबद्दल कोणतीही माहिती समोर आली नाही. त्यामुळे या मालिकेमध्ये अजून कोणते कलाकार दिसून येणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले.