Cm Devendra Fadnavis Wife Amruta Fadnavis Post : असे बरेच राजकारणी आहेत ज्यांचा कल अभिनयाकडे असलेला पाहायला मिळतो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसही सिनेविश्वात सक्रिय असल्याने नेहमीच चर्चेत असलेल्या पाहायला मिळतात. सोशल मीडियावर त्या नेहमीच सक्रिय असतात. सोशल मीडियावरुन त्या काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्याकडे नेहमीच ‘पॉवर कपल’ म्हणून पाहिले जातेअमृता फडणवीसांना कलाक्षेत्राची आवड असून त्या उत्तम गायिका आणि समाजसेविकाही आहेत. अमृता फडणवीस या त्यांच्या गाण्याच्या माध्यमातून चर्चेत राहत असतात. त्यांच्या गायनाने आजवर त्यांनी रसिकांच्या मनावर राज्य केलं आहे.
अनेक कार्यक्रमांमध्ये देवेंद्र यांच्याबरोबर अमृताही हजेरी लावताना दिसतात. अमृता या पेशाने बॅँकेत कामाला आहेत मात्र त्यांना गायनाचीही खूप आवड असल्यामुळे त्या वेगवेगळ्या कार्यक्रमात आपल्या गाण्याची झलक दाखवतात. अमृता फडणवीस या सोशल मीडियावरही बऱ्याच सक्रिय आहेत. नुकतीच नवं वर्षानिमित्त त्यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे.
या पोस्टमध्ये अमृता या आपल्या लेकीबरोबर गाणं गाताना दिसत आहे. त्यांनी गायलेलं हे गाणं इंग्रजी गाणं आहे. मुलगी दिविजासह त्यांनी मॅचिंग कपडे परिधान करुन हे गाणं शूट केलं आहे. तसेच हा व्हिडीओ शेअर करताना, तुमच्या आवडत्या व्यक्तीबरोबर हे वर्ष आनंदाने जगा अशा शुभेच्छा मिसेस मुख्यमंत्रींनी दिल्या आहेत. दरम्यान, अमृता यांच्या हा गायनाच्या पोस्टनंतर सोशल मीडियावर त्या ट्रोल झालेल्या पाहायला मिळत आहेत. याआधीही बरेचदा अमृता यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला.
मुख्यमंत्री देवेंद्र यांच्या पत्नी अमृता यांनी इंग्रजी भाषेत गाणं गात नव्या वर्षाचं स्वागत केलं, यामुळे त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला. “सगळ्या महाराष्ट्राला हिंदुत्व शिकवलं फक्त, घरात शिकवायचं राहिलं”, “अरे पण ते हिंदुत्व”, “तुमचं हिंदुत्व हे आहे का”, “संस्कृती मारली फाट्यावर”, “आता पाच वर्षे हेच ऐकायच आहे”, “अध्यक्ष महोदय हे चुकीचं आहे आपलं हिंदुत्ववादी सरकार आहे ख्रिश्चनवादी नाही”, अशा अनेक कमेंट करत त्यांना ट्रोल केलं आहे.