लोकप्रिय अभिनेत्री व ‘बिग बॉस’ ओटीटी सीजन १ची विजेती दिव्या अग्रवाल तिच्या लग्नामुळे चर्चेत आली आहे. मंगळवारी अभिनेत्रीच्या हळदी समारंभाचा कार्यक्रम पार पडला. लग्नाचा प्रत्येक सोहळा दिव्या एन्जॉय करत आहे. रविवार १८ फेब्रुवारीपासून दिव्याच्या लग्नविधींना सुरुवात झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. आज ही जोडी म्हणेजच दिव्या व अपूर्व हे दोघेही लग्नबंधनात अडकणार आहेत. तसेच दिव्याच्या लग्नासाठी त्यांनी पेस्टल ड्रेसकोड ठेवला आहे. काल अभिनेत्रीचा मेहंदी सोहळा अगदी उत्साहात पार पडला. मेहंदीसह दिव्याच्या हळदी समारंभाचे फोटोही व्हायरल झाले आहेत. या फोटोवर नेटकऱ्यांनी निशाणा साधला आहे. या फोटोंमध्ये नक्की काय आहे ते जाणून घेऊया. (divya Agrawal haldi ceremony)
दिव्याच्या हळदी समारंभांचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये ती निळ्या रंगाच्या वेस्टर्न आऊटफिटमध्ये खूप सुंदर दिसत होती. मात्र या समारंभासाठी केलेल्या सजावटीबद्दल अनेक चर्चा होत आहेत. या सजावटीमध्ये चिप्सच्या पॅकेट्सचा वापर केलेला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी अनेक मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
यावर एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, “हा कोणता नवीन ट्रेंड आला आहे?”, तर दूसरा नेटकरी बोलतोय की, “कदाचित ताई आपल्या दुसऱ्या लग्नामध्ये सर्व कार्यक्रम व्यवस्थित करेल, हिच्यासाठी लग्न म्हणजे मस्करी आहे”. काही नेटकऱ्यांनी तिच्या “आधीच्या प्रियकराबद्दल विचारणा करुन तो सध्या कुठे आहे? असे विचारले”.
दिव्या व अपूर्वच्या अफेअरच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरु होत्या. काही दिवसांपूर्वी दोघांनीही लग्न करण्याची घोषणा केल्यानंतर दिव्याच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. दिव्याचं जेव्हा ब्रेकअप झालं होतं, तेव्हा ती खूप निराश होती. त्यावेळी तिला अपूर्वने आधार दिला. दोघांच्याही मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. अपूर्व हा पेशाने इंजिनियर आहे.