बॉलिवूड अभिनेता आमिर खान हा नेहमी चर्चेत असतो. आजवर आमिर अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारताना दिसत आहे. आमिरचा मुलगा जुनैद खानदेखील त्याच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनयक्षेत्रात काम करताना दिसत आहे. अशातच आता आमिर मुलाचे नाटक बघण्यासाठी Runaway Brides बघण्यासाठी मुंबईतील पृथ्वी थिएटरमध्ये पोहोचला होता. मात्र यावेळी तो एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. अनेकदा आमिरची फॅशन बघायला मिळते. कधी त्याच्या कंपड्यांमुळे तर कधी त्याच्या हेअरस्टाइलमुळे चर्चेत आलेला बघायला मिळतो. मात्र त्याचा एक असा व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये त्याने एक कानातलं घातलं आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (amir khan viral video)
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये आमिर मुलगा जुनैदबरोबर पृथ्वी थिएटरमधून बाहेर पडताना दिसत आहे. यावेळी त्यांना बघून अनेक पापाराझीदेखील समोर येतात. आमिरने काळ्या रंगाची सलवार, राखाडी रंगाचा शॉर्ट कुर्ता घातला आहे. तसेच दोन्ही कानांमध्ये ऑक्सिडाइज झुमकेदेखील घातले आहेत. याबद्दल आता सर्वत्र चर्चा सुरु आहे.
आमिरचा हा लूक बघून नेटकऱ्यांनी त्याच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. एका नेटकऱ्याने लिहीले की, “झुमका गिरा रे बरेली के बाजार मे”, दुसऱ्या एकाने प्रतिक्रिया देत लिहिले की, “ही कसली फॅशन आहे?”, तिसऱ्या एकानेटकऱ्याने लिहिले की, “तो आता रजनीकांतच्या ‘कूली’ चित्रपटात खालनायकाची भूमिका साकारत आहे”. तसेच काही नेटकरी म्हणाले की, “मुलगी बनण्याची हौस आहे”.
आमिर २०२२ साली ‘लाल सिंह चढ्ढा’ या चित्रपटात दिसून आला होता. नंतर तो २०२३ साली ‘सलाम वेंकी’ या चित्रपटातही पाहुणा कलकार म्हणून दिसला होता. या वर्षी तो बहूचर्चित चित्रपट ‘सितारे जमीन पर’ मध्ये दिसून येणार आहे. तसेच तो आता रजनीकांतच्या ‘कूली’मध्ये दिसून येणार आहे. हा त्याचा पहिला तमिळ चित्रपट असणार आहे. तसेच तो ‘लाहोर १९४७’ या चित्रपटाची निर्मिती करत असून यामध्ये सनी देओल व प्रिती झिंटा हे कलाकार दिसून येणार आहेत.