बुधवार, जून 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

कॅन्सर उपचारानंतर सिस्ट, आजारपणामुळे सुप्रसिद्ध अभिनेत्रीचे कुटुंबीय चिंतेत, नणंद म्हणाली, “काहीतरी चुकतंय…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 24, 2026 | 10:46 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
dipika kakar cancer treatment

कॅन्सर उपचारानंतर सिस्ट, आजारपणामुळे सुप्रसिद्ध अभिनेत्रीचे कुटुंबीय चिंतेत, नणंद म्हणाली, "काहीतरी चुकतंय…"

dipika kakar cancer treatment : ‘ससुराल सिमर का’ फेम अभिनेत्री दीपिका कक्कर इब्राहिमवर सध्या दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एकीकडे दीपिका कॅन्सरवर उपचार घेत आहे. तर दुसरीकडे, तिला आता सिस्ट या आजारानेदेखील घेरलं आहे. डॉक्टरांनी सांगितले आहे की, त्या सिस्टवरही शस्त्रक्रिया करावी लागेल. सततच्या आजारपणामुळे दीपिकाचे कुटुंबीय खूप चिंतेत आहेत. कुटुंबीय आता दीपिकाच्या तब्येतीबाबत बोलताना भावुक झालेले दिसत आहेत. एका आजारातून सावरत बाहेर येतानाच दुसऱ्या आजाराने डोकं वर काढणं हे दीपिकासह तिच्या कुटुंबियांनाही त्रासदायक आहे. यावर आता दीपिकाची नणंद सबानेही प्रतिक्रिया दिली आहे. याशिवाय ती भावुकही झाली आहे.

दीपिकाची नणंद सबाने हा व्हिडीओ युट्युबवर शेअर केला आहे. सबा म्हणाली, “माझ्या वहिनी आणि भावाचा लग्नाचा वाढदिवस आहे. काय परिस्थिती आहे हे तुम्हा सर्वांना माहीत आहे. पण तरीही आम्ही केक कापला. वहिनीकडे बघून आम्हाला वाटले की ती किती खंबीर आहे. तिने मेहंदीही लावली. पण तिच्या शरीरात काय सुरु आहे ते माहित नाही. या सर्व गोष्टी कधी ना कधी परत येतात असे डॉक्टरांनी सांगितले होते. पण वहिनीची शस्त्रक्रिया झाली तेव्हा पुन्हा असं काही होणार नाही असं वाटत होतं”.

आणखी वाचा – कॅन्सर उपचारानंतर सुप्रसिद्ध अभिनेत्रीला आणखी एका आजाराचे निदान, अचानक पोटात दुखू लागलं अन्…; पतीनेच दिली माहिती

सबा पुढे म्हणाली, “पण जेव्हा आम्ही तिच्या सिस्टबद्दल ऐकले तेव्हा आम्हाला काय करावे हे समजले नाही. पण वहिनी खूप स्ट्राँग आहे, त्यामुळे आपल्यालाही तिच्यासाठी खंबीर व्हावं लागेल. रमजानचा महिना सुरु आहे. तुम्ही सर्व तिच्यासाठी प्रार्थना करा. त्यांच्यासाठी हा कसोटीचा काळ आहे. तो हॉस्पिटलमधून आला तेव्हा इफ्तारची वेळ होती. त्यामुळे तो येईल असे आम्हाला वाटले. आमची प्रतिक्रिया कशी असेल? आम्ही स्वतःला आतून बळकट करत होतो. अम्मा यांनी आम्हाला आधीच सांगितले होते. काहीतरी चुकतंय असं आम्हाला वाटलं. शांतता नव्हती. परिस्थिती कशीही असो वहिनी खूप खंबीर आहेत. उलट तीच आम्हाला धीर देते”.

आणखी वाचा – “रेवतीच्या लग्नाची खिल्ली उडवतोस का?”, चाहतीच्या प्रश्नावर आदिश वैद्य भडकला, म्हणाला, “तिला प्रेम मिळालं…”

सबाने पुढे सांगितले की, तिने घरी शोएब आणि दीपिकाचा केक कापला होता. पण दुसरे काही केले नाही. कारण दुसऱ्याच दिवशी दीपिकाला रुग्णालयात दाखल करावे लागले.

Tags: dipika kakardipika kakar cancerentertainment
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Shalva Kinjawadekar new serial
Entertainment

चार महिने तीन तास वर्कआउट आणि…; भूमिकेसाठी फिटनेसकडे लक्ष देतोय मराठी अभिनेता, नव्या मालिकेत झळकणार

जून 17, 2026 | 3:39 pm
sanchita ugale suicide
Entertainment

“लोकं मला घाबरतात, माझे सगळे पैसे संपले”, आत्महत्येपूर्वी अभिनेत्री सहा महिने डिप्रेशनमध्ये, डॉक्टरांशी संवाद उघड

जून 17, 2026 | 12:15 pm
Rushi Manohar Marathi Actor
Entertainment

मराठी सिनेविश्वाचा आश्वासक नायक ऋषी मनोहर, लवकरच ‘कप बशी’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

जून 17, 2026 | 10:52 am
sanchita ugale death reason
Entertainment

लेकीवर अत्याचार, पैशांची, इतर गोष्टींची मागणी आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…

जून 17, 2026 | 9:42 am
Next Post
shubhangi atre  struggle

घटस्फोटाच्या काही महिन्यांत पतीचं निधन, लेकीचा एकटीने सांभाळ आणि…; 'भाभीजी घर…' फेम अभिनेत्रीचा कठीण काळ, म्हणाली, "नवऱ्याचं जाणं…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.