अभिनेत्री दलजित कौर ही सध्या खूप चर्चेत असलेली पाहायला मिळते. २०२३ साली ती निखिल पटेलबरोबर लग्नबंधनात अडकली. मात्र लग्नाला वर्ष होण्याआधीच दोघंही वेगळे झाले. सुरुवातीला या सर्व प्रकाराबद्दल तिने मौन ठेवले होते. मात्र नंतर निखिलने स्वतः हे लग्न झालं नसल्याचा खुलासा केला आणि हे लग्न म्हणजे केवळ एक कार्यक्रम होता असेही सांगितले. इतकेच नाही तर त्याचे विवाहबाह्य संबंधदेखील होते आणि त्याला भारतातदेखील पाहिले गेले. त्यामुळे आता दलजितचे दुसरे लग्न वाचण्याची कोणतीही आशा नसल्याचे समोर आले आहे. (dalljiet kaur got threatened)
१६ सप्टेंबर २०२४ रोजी तिने एक निखिलच्या इन्स्टाग्राम स्टोरीचा एक स्क्रीनशॉट शेअर केला. यामध्ये तो कॉफी पिताना दिसत होता. यामध्ये त्याच्या हातात एक सोन्याची अंगठी होती ज्यामुळे दलजितला धक्का बसला. हे पाहिल्यानंतर तिने आपल्या इंन्स्टाग्राम स्टोरीवरुन या प्रकाराबद्दल भाष्य केले. तिची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली होती. अशातच आता पुन्हा तिने निखिलच्या साखरपुड्याबाबत धक्कादायक खुलासा केला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, दलजितने त्याची गर्लफ्रेंड सफीनाबरोबर फोनवर भांडण झाल्याचे समजले आहे. ‘टाइम्स नाऊ’च्या रिपोर्टनुसार, सफीनाने दलजितला मेसेज करुन तिच्याबद्दल बोलणं बंद करण्यास सांगितले आहे. तसेच हे सांगताना तिची भाषा अत्यंत असभ्य असल्याचेदेखील सांगितले. तसेच सफीना ही विवाहित असून नवऱ्याबरोबर खुश असल्याचेदेखील सांगितले आहे.
तसेच दलजित सफीनाचे वैवाहिक आयुष्यदेखील खराब करत असल्याचे ती म्हणाली आहे. तसेच असेच पुढे केल्यास तिच्या सायबर बुलिंगप्रकरणी तिच्यावर गुन्हादेखील करणार असेही तिने म्हंटले आहे. परंतु या सगळ्यांवर दलजितनेदेखील उत्तर दिले आहे. ती म्हणाली की, “सफिनाला जे करायचं आहे ते करुदे. पण माझ्याकडे सोशल मीडिया पोस्टसहित तिच्या विरोधातील अनेक पुरावे आहेत”. कायदेशीर कारवाई लढू शकण्याची आवाहनदेखील दिले आहे. दरम्यान दलजितने निखिलच्या विरोधात मुंबईतील आग्रीपाडा पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. तिने मारहाण, विश्वासघात, फसवणुकीचे आरोप केले आहेत.