Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आता आठवा आठवडा सुरु झाला आहे. दिवसेंदिवस या घरातील खेळ व खेळाबरोबर घरातील नातीही बदलतानाचे पाहायला मिळत आहे. बिग बॉस मराठीच्या घरात सुरुवातीच्या काही दिवसांत झालेल्या मैत्रीत आता कुठे तरी दुरावा येतोय की काय? असं चित्र पाहायला मिळत आहे. ग बॉस मराठी’च्या घरात सूरज चव्हाण हा अतिशय स्ट्रॉंग प्लेअर असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याला टास्क कळायला वेळ लागत असला तरी तो टास्क पूर्ण ताकदीने खेळतो. घरातील टास्कबद्दल अंकिता व पॅडी त्याला वेळोवेळी समजावत असतात. (Bigg Boss Marathi 5 New Promo)
बिग बॉस मराठीच्या घरात सूरज व पॅडी यांचे अनोखे नाते आहे आणि या अनोख्या नात्याचे दर्शन वेळोवेळी प्रेक्षकांनाही झाले आहे. मात्र आता सूरज व पॅडी यांच्यात काही कारणामुळे बिनसलं आहे आणि याचाच राग येऊन सूरजने पॅडी यांच्याविषयी गैरसमज बाळगला आहे. कलर्स मराठीच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे ‘बिग बॉस मराठी’च्या आगामी भागाचा एक प्रोमो नुकताच शेअर करण्यात आला आहे, ज्यातून सूरज व पॅडी यांच्यात मतभेद झाले असल्याचे पाहायला मिळत आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या गुरुवारच्या भागात एका टास्कदरम्यान, सर्वजण सराव करत असताना सूरज त्यांच्यामध्ये बोलतो. याचाच राग येत पॅडी त्याला “मध्ये बोलू नको” असं म्हणत ओरडतात आणि यामुळे सूरज दुखावलो जातो. दुखावलेला सूरज अंकिताजवळ येऊन आपलं मत व्यक्त करतो. तेव्हा अंकिता त्याची समजूत काढतात. याचबद्दल सूरज असं म्हणतो की, “मी माझं सांगितलं. मी बोलत असताना ते मध्ये बोलले म्हणून मी बोललो. नाही तर मी असं मध्ये कुणाला काही बोलत नाही”.
या नवीन प्रोमोमध्ये पॅडी सूरजची समजूत काढतात. मात्र तो समजूत घेत नाही. त्यामुळे पॅडी त्याला असं म्हणतात की, “मला माफ कर. तुला मी ओरडलो. पण इथून पुढे तू काय गडबड करणार असशील तर मी तुला काही सांगणार नाही. तुला वागायचं आहे तसं वाग”. त्यामुळे सूरज आणखी दुखवला जातो. त्यामुळे आता पॅडी व सूरज यांच्यातील बॉण्ड तुटणार का? की अंकिता सूरजलाअ समजावत त्याची समजूत काढेल. हे आजच्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.