टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री दलजित कौर सध्या अधिक चर्चेत आहे. तिचा दुसरा पती निखिल पटेलला घटस्फोट देण्यावरुन तिच्याबद्दल सर्वत्र चर्चा होत आहे. काही महिन्यांपूर्वी ती निखिल पासून वेगळे असल्याचे जाहीर केले होते. अनेकदा दलजितने सासरी झालेल्या त्रासाबद्दलही भाष्य केले आहे. तसेच दलजितबरोबर असलेले नातं हे अधिकृत नाही असे निखिलनेदेखील स्पष्ट केले आहे. यामध्ये आता त्यांच्या जवळच्या व्यक्तीने एक आश्चर्यजनक खुलासा केला आहे. हे ऐकून सगळेच जण हैराण झाले आहेत. त्यामुळे हे प्रकरण आता नक्की कोणत्या दिशेला जाणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. (Dalljiet Kaur wedding saree)
‘टाइम्स नाऊ’च्या अहवालानुसार, एका सूत्राने सांगितले की, “निखिलने दलजितला लग्नातील साडी सोफ्याचे कव्हर शिवण्यासाठी वापरावे असे सांगितले. यामुळे प्रेम एका वेगळ्या स्वरूपात टिकून राहील असंही तो म्हणाला. निखिलच्या या मागणीनंतर दलजितने लग्नातील साडीमधील एक चांगली साडी त्याला दिली. त्यानंतर त्याने या साडीचे सोफा कव्हर बनवले”.
त्यानंतर सूत्रांनी सांगितले की, “ही साडी म्हणजे निखिल व दलजितच्या प्रेमाची एक आठवण होती. ही साडी जेव्हा सोफ्यासाठी कव्हर शिवताना जेव्हा फाडली तेव्हा लग्नातील सर्व आठवणी दलजितच्या डोळ्यासमोर उभ्या राहिल्या. मात्र वेगळे झाल्यानंतर निखिलने सोफ्याला लावलेले कव्हर फाडले. जेव्हा दलजितने निखिलला साडी पाठवण्यासाठी सांगितले तेव्हा त्याने साडीचे फाटलेल्या अवस्थेत पाठवले”. दरम्यान जेव्हापासून दलजित व निखिल यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु झाल्या तेव्हापासून निखिलने त्यांचे लग्न झालेच नाही असे अनेकदा सांगितले आहे. त्याच्यावर असलेले सर्व आरोप निखिलने फेटाळून लावले आहेत.
दलजितने पहिले लग्न शालीन भानोतबरोबर झाले होते. मात्र दोघांमध्ये वाद झाल्यानंतर त्यांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर २०२३ साली ती निखिलबरोबर लग्नबंधनात अडकली. मात्र १० महीने पूर्ण होण्याआधीच त्यांच्यामध्ये मतभेद झाले आणि मुलाबरोबर ती भारतात परतली. दलजितने निखिलवर विवाहबाह्य संबंध व फसवणुकीचे आरोप केले होते.