टेलिव्हिजनवरील सगळ्यांचा आवडता अभिनेता म्हणजे अर्जुन बिजलानी आहे. त्याने आजवर अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. त्याच्या व्यावसायिक आयुष्याबरोबर खासगी आयुष्यामुळेदेखील अधिक चर्चेत आलेला दिसून येतो. अनेक मालिकांमधून तो प्रेक्षकांच्या समोर आला आहे. अभिनयाव्यतिरिक्त त्याने अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले आहे. तो त्याच्या सूत्रसंचालनाच्या पद्धतीने प्रेक्षक त्याला खूप पसंती दर्शवतात. ‘मिले जब हम तुम’ या मालिकेतून त्याला अधिक पसंती मिळाली. सध्या तो ‘प्यार का पहला अध्याय: शिव शक्ति’ मध्ये दिसून आला होता. अशातच आता त्याच्याबद्दलची एक अपडेट समोर आली आहे. (arjun bijlani mother hospitalized)
अर्जुनच्या आईला मुंबई येथील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी या रुग्णालयात भारती केले आहे. आईची तब्येत खूप बिगडल्याने आईला आयसीयुमध्ये भरती करण्यात आले आहे. तसेच त्यांच्या ऑक्सिजनची मात्रा कमी झाल्याने संपूर्ण कुटुंब आता चिंतेत आले आहे. याबद्दल अर्जुनने सांगितले की, “मला फक्त हेच सांगायचं आहे की ती लवकर बरी होऊदे”. याबद्दल त्याने इन्स्टाग्रामवर स्टोरीदेखील केली आहे. यामध्ये तो आईच्या डोक्यावर हात फिरवताना दिसत आहे.
तसेच तो पुढे म्हणाला की, “मुलगा अयानदेखील आजारी आहे. तो खूप दिवस शाळेत गेला नाही. माझी आई रुग्णालयात आहे आणि माझी पत्नी नेहालादेखील ताप आहे. ते लवकरच ठीक होतील अशी मला आशा आहे”. अर्जुनने सोशल मीडियावर आईबरोबरचे काही फोटोदेखील शेअर केले आहेत. या फोटोंवर प्रतिक्रिया देत चाहत्यांनी त्या लवकर बऱ्या व्हाव्यात अशी प्रार्थना करत आहेत.
आणखी वाचा – रणबीर कपूरचं लेकीबरोबर आहे खास बॉण्डिंग, राहाबरोबर मैदानात खेळतानाचे फोटो समोर
दरम्यान अर्जुनच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, याआधी तो ‘मिले जब हम तुम’, मेरी आशिकी तुमसे ही’, ‘नागिन’, ‘कवच’, ‘परदेस मे है मेरा दिल’, ‘इश्क मे मरजावा’ या मालिकांमध्ये दिसला होता.तसेच ‘इंडियाज गॉट टॅलेंट ९’, ‘रविवार विथ स्टार परिवार’, ‘एमटीव्ही स्प्लिट्सव्हीला १४’, ‘डान्स दिवाने २’, ‘किचन चॅम्पियन ५’ या रिॲलिटी शोचे सूत्रसंचालन केले आहे.