गुरूवार, सप्टेंबर 10, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अर्जुन बिजलानीच्या आई रुग्णालयात दाखल, आयसीयूमध्ये सुरु आहेत उपचार, तब्येत खालावल्यानंतर अभिनेता भावुक

Shamal Sawantby Shamal Sawant
जानेवारी 15, 2025 | 12:23 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
arjun bijlani mother hospitalized

अर्जुन बीजलानीची आई रुग्णालयात भरती

टेलिव्हिजनवरील सगळ्यांचा आवडता अभिनेता म्हणजे अर्जुन बिजलानी आहे. त्याने आजवर अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. त्याच्या व्यावसायिक आयुष्याबरोबर खासगी आयुष्यामुळेदेखील अधिक चर्चेत आलेला दिसून येतो. अनेक मालिकांमधून तो प्रेक्षकांच्या समोर आला आहे. अभिनयाव्यतिरिक्त त्याने अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले आहे. तो त्याच्या सूत्रसंचालनाच्या पद्धतीने प्रेक्षक त्याला खूप पसंती दर्शवतात. ‘मिले जब हम तुम’ या मालिकेतून त्याला अधिक पसंती मिळाली. सध्या तो ‘प्यार का पहला अध्याय: शिव शक्ति’ मध्ये दिसून आला होता. अशातच आता त्याच्याबद्दलची एक अपडेट समोर आली आहे. (arjun bijlani mother hospitalized)

अर्जुनच्या आईला मुंबई येथील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी या रुग्णालयात भारती केले आहे. आईची तब्येत खूप बिगडल्याने आईला आयसीयुमध्ये भरती करण्यात आले आहे. तसेच त्यांच्या ऑक्सिजनची मात्रा कमी झाल्याने संपूर्ण कुटुंब आता चिंतेत आले आहे. याबद्दल अर्जुनने सांगितले की, “मला फक्त हेच सांगायचं आहे की ती लवकर बरी होऊदे”. याबद्दल त्याने इन्स्टाग्रामवर स्टोरीदेखील केली आहे. यामध्ये तो आईच्या डोक्यावर हात फिरवताना दिसत आहे.

आणखी वाचा – क्रांती रेडकर व समीर वानखेडेंच्या लग्नाला आठ वर्ष पूर्ण, नवऱ्यासाठी शेअर केली सुखद पोस्ट, म्हणाली, “सर्व चढ-उतारांसह…”

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

तसेच तो पुढे म्हणाला की, “मुलगा अयानदेखील आजारी आहे. तो खूप दिवस शाळेत गेला नाही. माझी आई रुग्णालयात आहे आणि माझी पत्नी नेहालादेखील ताप आहे. ते लवकरच ठीक होतील अशी मला आशा आहे”. अर्जुनने सोशल मीडियावर आईबरोबरचे काही फोटोदेखील शेअर केले आहेत. या फोटोंवर प्रतिक्रिया देत चाहत्यांनी त्या लवकर बऱ्या व्हाव्यात अशी प्रार्थना करत आहेत.

आणखी वाचा – रणबीर कपूरचं लेकीबरोबर आहे खास बॉण्डिंग, राहाबरोबर मैदानात खेळतानाचे फोटो समोर

दरम्यान अर्जुनच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, याआधी तो ‘मिले जब हम तुम’, मेरी आशिकी तुमसे ही’, ‘नागिन’, ‘कवच’, ‘परदेस मे है मेरा दिल’, ‘इश्क मे मरजावा’ या मालिकांमध्ये दिसला होता.तसेच ‘इंडियाज गॉट टॅलेंट ९’, ‘रविवार विथ स्टार परिवार’, ‘एमटीव्ही स्प्लिट्सव्हीला १४’, ‘डान्स दिवाने २’, ‘किचन चॅम्पियन ५’ या रिॲलिटी शोचे सूत्रसंचालन केले आहे.     

Tags: Arjun bijlanihospitalisedmother
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

Kaakul Marathi Movie
Entertainment

‘काकुळ’च्या थरारक रहस्याचा उलगडा होणार नोव्हेंबरमध्ये, मोनालिसा बागलची प्रमुख भूमिका

सप्टेंबर 9, 2026 | 9:50 am
Dashami Movie Song
Entertainment

‘बुरी नजर वाले.. तेरा मुँह काला’ चा स्वॅग, ‘दशमी’ चित्रपटाचं हटके गाणं चर्चेत

सप्टेंबर 9, 2026 | 9:40 am
Daryabhavani Marathi Movie
Entertainment

‘दर्याभवानी’ साठी दिग्पाल लांजेकरांचे अनोखं गाऱ्हाणं, शूटिंगला सुरुवात, होणार ‘या’ दिवशी प्रदर्शित

सप्टेंबर 9, 2026 | 9:32 am
Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Next Post
'अबोली' मालिकेत 'बिग बॉस मराठी' फेम जान्हवी किल्लेकरची एन्ट्री, प्रोमोने वेधलं लक्ष, प्रेक्षकांकडून कौतुकाचा वर्षाव

'अबोली' मालिकेत 'बिग बॉस मराठी' फेम जान्हवी किल्लेकरची एन्ट्री, प्रोमोने वेधलं लक्ष, प्रेक्षकांकडून कौतुकाचा वर्षाव

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.