होणार सून मी या घरची या मालिकेतून काही ही हा श्री असं म्हणत ज्या अभिनेत्रीने सगळ्यांना वेड लावलं. ती अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान.चेहऱ्यावर सुंदर हास्य आणि सुंदर अभिनय यामुळे तेजश्री कायमच चर्चेत असते.तेजश्रीने अनेक मालिका आणि चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारून सिनेसृष्टीत स्वतःची ओळख निर्माण केली.तेजश्री सध्या सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असून ती तिच्या फोटो व्हिडिओच्या माध्यमातून चाहत्यांशी संपर्क साधते. तर अश्या या हसमुख तेजश्रीची पहिली मालिका तुम्हाला माहिती आहे का?(Tejashree Pradhan)
खरंतर तेजश्रीला अभिनयाची आवड बालपानापासून नव्हती. तिने दहावीच्या सुट्ट्यांमध्ये पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा कोर्स केला. त्याच वेळी ती ऍक्टिंग देखील शिकली. त्यांनतर ती कॉलेजमध्ये असताना तिला काउंसलर व्हायचं होतं. पण काही कारणांमुळे तिने पॉलिटिकल सायन्स या विषयातून पदवी घेतली. कॉलेज मध्ये SYला असताना तिच्या ऍक्टिंग क्लासद्वारे तिला तिची पहिली मालिका मिळाली. ह्या गोजिरवाण्या घरात असं या मालिकेचे नाव आहे. २००६ साली आलेल्या या मालिकेने सलग ४ वर्ष छोट्या पडद्यावर चाहत्यांचं मनोरंजन केलं होतं. या मालिकेत एक लहानशी भूमिका तेजश्रीने साकारली. आणि या मालिकेतील भूमिकेपासून तेजश्रीच्या अभिनयाची सुरुवात झाली. त्यांनतर तिने अग्ग्बाई सासूबाई, होणार सून मी या घरची, ती सध्या काय करते,झेंडा अश्या अनेक मालिका आणि चित्रपटात काम केलं आहे.(Tejashree Pradhan)
हे देखील वाचा: अनघा वाचवू शकेल का अभिचा जीव ?
तसेच आता देखील तेजश्री एक चित्रपटाच्या शूटिंगसाठी लंडनला गेली आहे. ही माहिती तिने स्वतः एरपोर्ट वरील एक फोटो शेअर करत दिली होतीं. पण तिचा हा चित्रपट कोणता किंवा तिची भूमिका कोणती हे अजूनही तिने गुलदस्त्यात ठेवलंय.यामुळे चाहते सध्या तिच्या या प्रोजेक्टविषयी जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.
