एखादा कलाकार रुपेरी पडद्यावर जेव्हा आपलं पहिलं पाऊल टाकतो तेव्हा त्याच्या सोबत असणाऱ्या कलाकारांना त्याच्या आयुष्यात एक महत्वाचं स्थान देतो. मग कितीही चित्रपट केले, कितीही शोज केले, अनेक मालिकांमध्ये काम केले अनेक कलाकार भेटले तरी त्यावेळी मदत केलेल्या सह कलाकाराला न विसरणं हे खऱ्या कलाकाराचं लक्षण मानलं जात.(Makrand Anaspure Tejaswini Lonari)
आपल्या सोबत असलेला सहकलाकार आपल्या पेक्षा वयाने, अभिनयाने, अनुभवाने मोठा असं आणि त्याकडून नेहमी शिकत राहणं हे कलाकाराला पुढील वाटचाली साठी नक्कीच फायद्याचं ठरत. अशीच एक पोस्ट सध्या चर्चेत आहे ती म्हणजे अभिनेत्री तेजस्विनी लोणारीची. मराठी चित्रपट सृष्टीतील मानाचं नाव म्हणजे अभिनेते मकरंद अनासपुरे, गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा पासून पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा पर्यंत अनेक विनोदी चित्रपटांमधून मकरंद यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. तसेच काही दिवसांपूर्वी सोनी मराठीवरील पोस्ट ऑफिस उघड आहे या मालिकेतील मकरंद यांची भूमिका देखील प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरली.
तर तेजस्विनी लोणारी ने एक खास पोस्ट करत मंकरंद अनासपुरे यांच्या बद्दल आदर व्यक्त केला आहे.

तेजस्विनी ने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून मकरंद अनासपुरे यांच्या सोबतचे काही फोटोज शेअर करत कॅप्शन मध्ये ‘वयाच्या सोळाव्या वर्षांपासुन मला जे गुरु आणि सहकलाकार म्हणून लाभलेले Makarand Anaspure sir , ज्यांच्याबरोबर पाच चित्रपट करण्याचा योग आला आणि त्या चित्रपटांमुळे जी प्रसिद्धी मिळाली आता हीच जोडी तुमच्यासाठी घेऊन येत आहे 6th from the Instalment…धमाकेदार चित्रपट….Stay तुनेड’ असं लिहिलं आहे.(Makrand Anaspure Tejaswini Lonari)
हे देखील वाचा – सबसे कातिल गौतमी पाटील आता झळकणार चित्रपटात
तेजस्विनी ने म्हणाल्या प्रमाणे वयाच्या सोळाव्या वर्षी पासून ती मकरंद अनासपुरे यांच्या सोयाबीत काम करत आहे. ते तिला गुरूच्या स्थानी असून वेळोवेळी त्यांनी मार्गदर्शन केल्याचेही तिने म्हणले आहे. सोबतच ती म्हणाले आता पर्यंत ५ चित्रपटांमध्ये तिला मकरंद अनासपुरे यांच्या सोबत काम करण्याचा योग्य आला आणि आता लवकरच मकरंद अनासपुरे यांच्या सोबत ६ वा चित्रपट देखील येण्याच्या मार्गावर आहे. तसेच तेजस्विनी नुकतीच मराठी बिग बॉस सीजन ४ मध्ये ही झळकली होती आणि लवकरच ती आगामी कलावती या चित्रपटात देखील झळकणार असल्याची चर्चा आहे.