“सत्यशोधक” चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते मोशन पोस्टरचे अनावरण

Satyashodhak New Movie
Satyashodhak New Movie

सध्याच्या परिस्थती अनेक चित्रपट रुपेरी पडद्यावर पाहायला मिळतात. आपल्या मराठी मातीत मिसळल्या अनेक समाजसुधारकांवर चित्रपट आपल्याला पाहायला मिळतात. चित्रपटांमधून समाज प्रबोधन करणं हे दिगदर्शकांचं उद्देश ही यातून साध्य होताना दिसतोय. महाराष्ट्रातील अशाच एका महान समाज सुधारकाची गोष्ट मोठ्या पडद्यावर लवकरच मांडला जाणार आहे. समता फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती केली जाणार असून नुकतंच या चित्रपटाचं मोशन पोस्टर लाँच करण्यात आलं आहे.(Satyashodhak New Movie)

या चित्रपटामध्ये सत्यशोधक म्हणून ओळख असणारे महात्मा जोतीराव फुले यांचं जीवनचरित्र मांडण्यात येणार असुन या चरित्रपटाचे नाव ‘सत्यशोधक’ असे ठेवण्यात आले आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शित करण्यात आलेल्या मोशन पोस्टरला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद पाहायला मिळतोय. या मोशन पोस्टरचे अनावरण महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री मा. सुधीरजी मुनगंटीवार यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे करण्यात आले. याप्रसंगी चित्रपटाचे निर्माते प्रविण तायडे, आप्पा बोराटे, भीमराव पट्टेबहादूर, विशाल वाहूरवाघ, लेखक आणि दिग्दर्शक निलेश जळमकर यांच्यासह चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञ उपस्थित होते.(Satyashodhak New Movie)

“सत्यशोधक” या चित्रपटाच्या मोशन पोस्टरमध्ये तत्कालीन व्यवस्थेचे आणि स्त्रियांवरील अत्याचाराचे दाहक सत्य दाखविले आहे, तसेच या कलाकृतीतून महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी समाजासाठी केलेला संघर्ष मांडला आहे. बहुआयामी कलाकार संदीप कुलकर्णी “सत्यशोधक” मध्ये महात्मा फुले यांची भूमिका साकारणार असून राजश्री देशपांडे, रवींद्र मंकणी, गणेश यादव, सुरेश विश्वकर्मा, सिद्धेश्वर झाडबुके, अनिकेत केळकर, अनिरुद्ध बनकर, राहुल तायडे, मोनिका, जयश्री गायकवाड, डॉ. खेडेकर, डॉ. सुनील गजरे या कलाकारांची साथ त्यांना लाभणार आहे.

सुधीरजी मुनगंटीवार याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले “सत्यशोधक या चित्रपटाचे मोशन पोस्टर अनावरण करताना मला अतिशय आनंद होतो आहे. २१व्या शतकात समाजातील आपण सर्वजण एकमेकांपासून हळूहळू दूर जात आहोत व अशा काळात सत्यशोधक हा चित्रपट समाजाला दिशा देणारा असेल. क्रांतिसूर्य जोतिबा फुले यांचा “सब समाज को साथ लिए हम, हम को है आगे बढना” हा विचार आणि त्यांच्याबरोबर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी भिडे वाडा येथे महिलांसाठी सुरु केलेली शाळा हा प्रवास दाखविणाऱ्या “सत्यशोधक” या चित्रपटाच्या माध्यमातून अनेकांना प्रेरणा प्राप्त होईल. चित्रपट निर्मितीतून समाज परिवर्तनाची मशाल पेटवायची हे कार्य या चित्रपटाच्या माध्यमातून करणाऱ्या निर्मात्यांचे व कलाकारांचे मी मनापासून अभिनंदन करतो.”(Satyashodhak New Movie)

समता फिल्म्स प्रस्तुत आणि निलेश जळमकर लिखित व दिग्दर्शित “सत्यशोधक” या चित्रपटाची निर्मिती प्रविण तायडे, आप्पा बोराटे, भीमराव पट्टेबहादूर, विशाल वाहूरवाघ यांनी केली असून सहनिर्माते प्रतिका बनसोडे, हर्षा तायडे, राहुल वानखेडे आणि प्रमोद काळे आहेत. किशोर बळी आणि डॉ. चंदू पाखरे यांच्या गीतांना अमित राज यांनी संगीतबद्ध केले असून स्वतः अमित राज, वैशाली सामंत आणि विवेक नाईक यांनी स्वरसाज चढवला आहे तर छायांकन अरुण प्रसाद यांचे आहे. “सत्यशोधक” हा चित्रपट 2023 मध्ये लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
Rasika Sunil Suyog Kissing scene
Read More

‘आता आमच्या दोघांची लग्न झाली आहेत पण…’अभिनेत्री रसिकाने शेअर केला किसिंग सिन बाबतचा तो किस्सा

चित्रपटात आपण एखादा सीन पाहताना जेवढा आनंद होतो कलाकारासाठी ते तेवढच अवघड असत तो सीन पडद्यावर साकारणं. बऱ्याचदा…
Butterfly New Marathi Movie
Read More

का छोट्याश्या गोष्टीने आयुष्याला लखलख लाइटिंग कसं होत ह्याची गोष्ट सांगणारा “बटरफ्लाय”!!

मनोरंजन विश्वात अनेक विषयांवर चित्रपट येत असतात. सामान्य होममेकरच्या जीवनावर आधारित असाच एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. उत्तम…
Get Together Upcoming Movie
Read More

“गेट टूगेदर” या चित्रपटात पाहायला मिळणार पहिल्या प्रेमाची हळवी गोष्ट- देवमाणूस फेम एकनाथ गीतेची मुख्य भूमिका

पहिल्या प्रेमाची गोष्ट सांगणाऱ्या गेट टुगेदर या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला. रोमान्स, हळुवारपणा, अल्लडपणाचे अनेक रंग…
Khillar New Marathi Movie
Read More

रुपेरी पडद्यावर रंगणार बैलगाडा शर्यतीचा थरार रिंकू आणि ललितचा नवीन चित्रपट, मकरंद माने करणार दिग्दर्शन

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सध्या चर्चा सुरु आहे ती म्हणजे बैलगाडा शर्यतीची. अनेक वेळा प्रेक्षकांनी चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक यांच्याकडे बैलगाडा…
Chaouk Marathi Movie Teaser
Read More

कलाकारांची मांदियाळी आणि सामाजिक विषय हाताळणारा चौकचा टिझर म्हणतोय ‘ वाघ आला वाघ’

सध्या मराठी चित्रपटांच्या रांगाच लागल्यात. रोमँटिक, आशयघन चित्रपटांची चलती असताना एका वेगळ्याच विषयावर भाष्य करणारा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या…
New marathi movie
Read More

आई कुठे काय करते मालिकेतील ‘या’ अभिनेत्याचं मोठ्या पडद्यावर आगमन लेखक म्हणून पार पडणार महत्वाची भूमिका

कोणत्याही कलाकाराच्या एखाद्या चित्रपटातील, मालिकेतील भूमिकेवरून त्याच्या कलेची तुलना करणं हे चुकीचं असत कारण एखादा कलाकार हा कोणत्याही…