पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान तिच्या प्रेग्नन्सी पोस्टमुळे विशेष चर्चेत आली आहे. तिची प्रेग्नंन्सीबाबत तसेच ती कोणत्या महिन्यात बाळाला जन्म देऊ शकते याबाबतची पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली होती. या पोस्टला तिच्या चाहत्यांनी भरभरुन शुभेच्छादेखील दिल्या. याबाबत सोशल मिडिया पोस्टवर माहिराने कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती, पण आता मात्र तिने या चर्चांवर मौन सोडले आहे. तिला पहिल्या पतीपासून एक १५ वर्षाचा मुलगा आहे. अभिनेत्रीने ती गरोदर नसून कोणतीही नेटफ्लिक्सची सिरीज सोडलेली नाही तसेच संपूर्ण लक्ष हे करिअरवर असल्याचे तिने स्पष्ट केले आहे. (mahira khan on pregnancy rumors)
माहिरा खानचे पहिले लग्न पाकिस्तानी अभिनेता व दिग्दर्शक अली तस्करीसह २००७ मध्ये झाले होते. अंतर्गत मतभेदांमुळे दोन वर्षातच या दोघांचा घटस्फोट झाला. पहिल्या पतीपासून माहिराला आजलान नावाचा १५ वर्षाचा मुलगा आहे. त्यानंतर २०२३ मध्ये तिने व्यावसायिक सलीम करीमसह लग्नगाठ बांधली. सध्या ती आपल्या कुटुंबासह वेळ घालवत आहे. अशामध्येच तिच्या गरोदर असण्याच्या पोस्ट व्हायरल झाल्या. याबाबत बोलताना अभिनेत्री म्हणाली, “हे खरं नाही आहे की मी गरोदर आहे. आणि मी कोणतीही नेटफ्लिक्सची सीरिज सोडलेली नाही” असं ती म्हणाली.
या पोस्ट व्हायरल झाल्यानंतर माहिराने नेटफ्लिक्सचे दोन प्रोजेक्ट सोडल्याच्या चर्चाही रंगल्या. परंतु या वृत्ताचे माहिराने खंडन केले आहे. माहिरा पाकिस्तानी अभिनेता फवाद खानसह ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर ‘जो बचे संग समेट लो’ या सिरीजमध्ये दिसणार असल्याचे माध्यमाच्या सूत्रांकडून समजले आहे. ही सिरीज उर्दू कादंबरीवर आधारित आहे. माहिरा व फवादची फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याने अधिक उत्सुकता निर्माण झाली आहे. सुत्रांनुसार या सीरिज तीन सीजन असून एका सीजनमध्ये १२ भाग असणार आहेत आहेत. याव्यतिरिक्त माहिरा अजून एका सीरिजमध्ये दिसू शकते पण याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही आहे.
३९ वर्षाच्या माहिराने आतापर्यंत अनेक पाकिस्तानी चित्रपट व सिरीजमध्ये काम केले आहे. किंग खान शाहरुख खानची सह अभिनेत्री म्हणून ‘रईस’ चित्रपटामध्येही ती झळकली. या चित्रपटाची तिच्या भूमिकेचं विशेष कौतुकही झालं. माहिरा सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच प्रेक्षकांशी संवाद साधत असते.