शनिवार, मे 30, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

१४ वर्षांनी लहान मुलीशी लग्न, सहअभिनेत्रीने मारलं अन्…; आता कुठे गायब आहे ‘दिया और बाती हम’ फेम अभिनेता?

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑगस्ट 31, 2024 | 3:56 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
anas rashid married life

'दिया और बाती' फेम अभिनेता अनस रशिद सध्या काय करतो ?

टेलिव्हिजनवरील ‘दिया और बाती हम’ या मालिकेला अधिक प्रसिद्धी मिळाली. २०११ साली आलेल्या या मालिकेने सगळ्यांच्याच मनावर राज्य केले आहे. आजही या मालिकेतील सर्व भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या. यामधील सूरज व संध्या या जोडीला प्रेक्षकांचे अधिक प्रेम मिळाले आहे. या भूमिका अनस राशिद व दीपिका सिंह यांनी साकरल्या होत्या. दीपिका आजही काही मालिकांमध्ये काम करताना दिसत आहे. मात्र अनस अभिनयक्षेत्रापासून दूर असलेला पाहायला मिळत आहे. अशातच आता त्याच्याबद्दलची एक अपडेट समोर आली आहे.  (anas rashid married life)

‘दिया और…’नंतर अनस कोणत्याही मालिकेमध्ये दिसून आला नाही. त्याचा जन्म ३१ ऑगस्ट १९८० रोजी एका मुस्लिम कुटुंबामध्ये झाला. त्याला दोन भाऊ व दोन बहिणी आहेत. त्याने शालेय शिक्षण उर्दू भाषेमध्ये पूर्ण केले. तसेच मानसशास्त्रामध्ये पदवी घेतली. तसेच त्याला हिंदी, उर्दू, अरबी व फारसी भाषेचे ज्ञान आहे. तसेच तो गायक देखील आहे आणि २००४ साली त्याला मिस्टर पंजाबचे पारितोषिकदेखील मिळाले आहे. २००६ साली त्याची पहिली मालिका ‘कही तो होगा’ प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेमध्ये त्याने कार्तिक अहलुवालिया ही भूमिका साकारली होती.

आणखी वाचा – “देव येऊनच स्वच्छ करतील”, नदीतील कचरा पाहून भडकला शशांक केतकर, म्हणाला, “सण महत्त्वाचे पण…”

View this post on Instagram

A post shared by AnasRashid (@anasrashidactor)

अनसने २०१७ साली लग्न केले. त्याने १४ वर्षांनी लहान असणाऱ्या हिना इक्बालबरोबर लग्न केले. इतक्या लहान मुलीबरोबर लग्न का केले? असे विचारताच त्याने उत्तर दिले की, “मी हिनाला माझ्या वयाबद्दल विचारले तेव्हा ती लग्नासाठी तयार असल्याचे सांगितले. त्यावेळी ती केवळ २४ वर्षांची होती”.

आणखी वाचा – तरुण वयातच नवऱ्याला गमावलं, ५४व्या वर्षीही एकटीच राहते सुप्रसिद्ध अभिनेत्री, आता जगत आहे असं आयुष्य

त्यानंतर हिनाने अनसलादेखील लग्न करण्याबद्दल प्रश्न विचारला, त्यावर त्याने सांगितले की, “माझ्यासाठी वय महत्त्वाचे नाही. माझ्या बहिणी म्हणतात की मी २६ वर्षाचा वाटतो म्हणून”. दरम्यान आता हिना व अनसला खबिब नावाचा मुलगा व आयत नावाची मुलगी आहे. ‘दिया और…’ मालिकेदरम्यान दीपिकाने अनसला कानाखाली मारली होती. चित्रीकरणादरम्यान दीपिकाला अनसने केलेला स्पर्श चांगला वाटला नाही. त्यावेळी खूप भांडणं झाली आणि दीपिकाने मालिका सोडण्याचीदेखील धमकी दिली होती.   

Tags: anas rashiddiya aur batu humHindi serial
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Tumbadchi Manjula Makarand Anaspure
Entertainment

‘तुंबाडची मंजुळा’मधील मकरंद अनासपुरेंचा लूक समोर, अभिनेत्याचा साधू अवतार चर्चेत

मे 30, 2026 | 5:08 pm
Gurmeet Choudhary Debina Bonnerjee
Entertainment

अनेक गर्भपात, सरोगसीद्वारे लेकीचा जन्म…; लग्नाच्या ११ वर्षांनी सुप्रसिद्ध अभिनेत्रीची आई होण्याची धडपड, नवऱ्याकडून खुलासा

मे 30, 2026 | 2:00 pm
Star Pravah Latest News
Entertainment

तीन महिन्यांत आठ नवेकोरे कार्यक्रम; स्टार प्रवाह वाहिनीची मोठी घोषणा, दिग्गज कलाकार झळकणार

मे 30, 2026 | 12:30 pm
 Rekha and Amitabh Bachchan
Entertainment

अभिनेत्यासह संध्याकाळ एकत्र घालवायला सुप्रसिद्ध अभिनेत्रीची भलतीच मागणी, खलनायकाचा खुलासा

मे 30, 2026 | 11:29 am
Next Post
Abhinay Berde shares a memory about late actor and his father Laxmikant Berde see the details

"लक्ष्याच विंगेत उभं राहून लेकाला…", वडिलांच्या आठवणीत अभिनय बेर्डे भावुक, म्हणाला, "माझं पहिलं नाटक त्यांनी बघितलं असतं तर…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.