बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“देव येऊनच स्वच्छ करतील”, नदीतील कचरा पाहून भडकला शशांक केतकर, म्हणाला, “सण महत्त्वाचे पण…”

Saurabh Moreby Saurabh More
ऑगस्ट 31, 2024 | 1:43 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Star Pravah Muramba serial fame actor Shashank Ketkar shared a angry post about river pollution in India

भारतातील नदी प्रदूषणावर भडकला शशांक केतकर, ‘सण महत्त्वाचे, निसर्ग नाही’ म्हणत शेअर केली मार्मिक पोस्ट

आपल्या देशातील नद्या जीवनरेखा म्हणून ओळखल्या जातात. त्याचबरोबर देशाची संस्कृती आणि सभ्यतेचा दर्पण म्हणूनही नद्यांकडे पाहिले जाते. भारतीय संस्कृती, समाज, राज्यकर्ते आणि संतांनी नद्यांना आईची उपमा दिली आहे. परंतु, वाढते औद्योगिकीकरण, शहरीकरण आणि लोकसंख्येमुळे मोठ्या नद्यांमध्ये प्रदूषण वाढले आहे. याचमुळे जीवनदायिणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नद्या आता दूषित होऊन मृत्यूचे कारण बनत आहेत. भारतात अनेक ठिकाणी नदीचा वापर धार्मिक कारणासाठी केला जाऊन त्यात हार-तुरे, निर्माल्य तसंच अनेक गोष्टी टाकल्या जातात. यामुळे नदीचे पाणी दूषित होऊन त्याचा नागरीकांच्या आरोग्यावर परीणाम होतो आणि यावर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याने भाष्य केलं आहे. (Shashank Ketkar on River Pollution)

शशांक हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. सोशल मीडियाद्वारे तो नेहमीच त्याच्या राजकीय व सामाजिक भूमिका मांडत असतो. याआधी त्याने अनेकदा त्याच्या राजकीय व सामाजिक भूमिका सोशल मीडिया किंवा मुलाखतीच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत. अशातच त्याने आता नदीच्या वाढत्या प्रदूषणावरही त्याची भूमिका व्यक्त केली आहे. परदेशात नदीला नदीचं मानलं जातं. पण भारतात नदीला ‘माता’ म्हणूनही तिचे पावित्र्य राखलं जात नाही आणि यावर शशांकने मौन सोडलं आहे. “सण महत्त्वाचे. निसर्ग नाही” असं उपरोधिक भाष्यही त्याने या पोस्टमधून केलं आहे.

आणखी वाचा – तरुण वयातच नवऱ्याला गमावलं, ५४व्या वर्षीही एकटीच राहते सुप्रसिद्ध अभिनेत्री, आता जगत आहे असं आयुष्य

शशांकने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत भारतातील नदीबद्दल होणाऱ्या प्रदूषणावर भाष्य केलं आहे. शशांकने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये परदेशात नदीला नदी म्हणून बघतात, त्यामुळे ती स्वच्छ ठेवतात. असं म्हटलं असून नदीचे स्वच्छ रुप पाहायला मिळत आहे. पण भारतात नदीला माता म्हणत तिची पूजा केली जाते. मात्र निर्माल्य आणि इंटर कचरा नदीत  टाकून टिचे पावित्र्य भंग केले जाते. याबद्दल भाष्य करण्यात आले आहे. यावर शशांकने असं म्हटलं आहे की, “आपण घाबरायची गरज नाही. देव येऊन स्वच्छ करतील”.

आणखी वाचा – इंडस्ट्रीमध्ये चाललंय तरी काय?, अभिनेत्रींबरोबरच पुरुष कलाकारांचेही होत आहे लैंगिक शोषण, लोकप्रिय अभिनेत्याचे गंभीर आरोप

तसंच यापुढे शशांकने “सण महत्त्वाचे. निसर्ग नाही” असं उपरोधिक भाष्यही या पोस्टमधून केलं आहे. दरम्यान, शशांक केतकर सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुरांबा’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याआधी त्याने होणार सून मी या घरची व मन हे बावरे सारख्या लोकप्रिय मालिकांतही काम केले आहे. अभिनेता मालिकांमधील भूमिकांसाठी जितका चर्चेत राहत असतो. तितकाच तो सोशल मीडियावर आपली मतं व्यक्त करत चर्चेत राहत असतो.   

Tags: Muramba Serial Fameshashank ketkarShashank Ketkar River Pollution Post
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Salman Khan Skipped Asha Bhosle Funeral
Entertainment

Asha Bhosle Funeral : मुंबईत असूनही आशा भोसलेंच्या अंत्यसंस्काराला शाहरुख आणि सलमान खान का आले नाहीत?, कारण समोर…

एप्रिल 15, 2026 | 9:47 am
Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Next Post
kangana ranaut on movie release

Emergency चित्रपटामुळे कंगना रणौतला जीवे मारण्याची धमकी, म्हणाली, “इंदिरा गांधीची हत्या न दाखवण्यासाठी…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.