प्रसिद्ध तमिळ अभिनेते मोहन यांचे मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. शुक्रवारी मदुराईतील थिरुपरनकुंद्रम येथील रस्त्यावर संशयास्पद स्थितीत त्यांचा मृतदेह आढळून आला, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यांच्या निधनाची बातमी ऐकून चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे, अभिनेते मोहन यांनी दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हसन यांच्यासह काम केलेलं आहे. (tamil actor mohan died)
स्थानिक वृत्तांनुसार, मूळचे सेलम जिल्ह्यातील मेत्तूरचे रहिवासी असलेले अभिनेते मोहन यांनी अनेक तमिळ चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. पण चित्रपटसृष्टीत काम न मिळाल्यामुळे अभिनेते काही वर्षांपूर्वी आपल्या मूळ गावी स्थायिक झाले होते. मात्र आर्थिक स्थिती अधिकच बिघडल्याने ते मदुराईतील थिरुपरनकुंद्रम येथे स्थायिक झाले.
या दरम्यानच्या काळात त्यांनी अनेक प्रयत्न केले. मात्र काम मिळत नसल्याने शेवटी आपल्या उदरनिर्वाहासाठी ते रस्त्यावर पैसे मागू लागले होते. १० वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचे निधन झाले.
हे देखील वाचा – जेवण बनवताना तेलाचा वापरच करत नाही जिनिलीया देशमुख, म्हणालेली, “तेल न वापरता मी…”
गेल्या ३१ जुलै रोजी स्थानिकांना अभिनेते मोहन यांचा मृतदेह रस्त्यावर आढळून आला आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी सांगितले की, मोहनचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मदुराई सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदनानंतर अभिनेत्याचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी त्याच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.

हे देखील वाचा – Salman Khan Video : भावाच्या बर्थडे पार्टीमध्ये सलमान खानचीच सर्वाधिक चर्चा; कारण ठरली ‘ती’ गुलाबी पँट, व्हिडीओ व्हायरल
अभिनेते मोहन हे सहाय्यक भूमिकांसाठी प्रसिद्ध होते. १९८९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अपूर्व सगोधररगल’ या चित्रपटात मोहन यांनी कमल हसनच्या मित्राची भूमिका साकारली होती. याशिवाय त्यांनी ‘नान कडवूल’ या चित्रपटातही काम केले होते. (tamil actor mohan died)