प्रत्येकाच्या आयुष्यात आई आणि वडील या दोन्ही शब्दांचं महत्व अनन्यसाधारण असतं. आई जन्म देते, सांभाळ करते, प्रेम देते, सांभाळून घेते म्हणून ती जवळची होते. पण खऱ्या अर्थाने जगणं शिकवणारा असतो तो बाप. आयुष्याच्या प्रत्येक मोठ्या वळणावर आपल्या मुलांचं भलं व्हावं यासाठी खचता खाणारा असतो तो बाप. मुलांच्या मागे खंबीरपणे उभा राहणारा असतो तो बाप. जगण्यात राम आणि आराम असतो तो केवळ बाप असल्यावरच… याच बापाचं छत्र अचानक डोक्यावरुन नाहीसं झालं की… हे आयुष्य नको नको वाटतं. असंच काहीसं वाटतं आहे दिग्दर्शक रवी जाधव यांना. (ravi jadhav emotional)
चार वर्षांपूर्वी रवी जाधव यांना पितृशोक झाला होता. दिग्दर्शक रवी जाधव यांचे वडील रिश्चंद्र भिकाजी जाधव यांचे ०९ जानेवारी २०२१ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले होते आणि आजही रवी जाधव यांना आपल्या वडिलांची आठवण येते. वडिलांच्या निधनानंतर रवी जाधव यांनी कायमच आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. आपली वडिलांबद्दल ते अनेकदा सोशल मीडियाद्वारे व्यक्त झालेले पाहायला मिळाले आहेत. अशातच त्यांनी नुकतीच वडिलांच्या आठवणीत एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत त्यांनी आपल्या वडिलांबद्दलची भावुक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
आणखी वाचा – “हे खरंही असू शकतं आणि…” धनश्री वर्माबरोबरच्या नात्याबद्दल युजवेंद्र चहलचे थेट भाष्य, म्हणाला, “खूप वेदना…”
इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये सुरुवातीला “तुमची खूप आठवण येत आहे. माझे हीरो, माझे हृदय” असं म्हटलं आहे. यात रवी जाधव यांचे वडील नाचत असल्याचा जुना व्हिडीओ आहे. त्याचबरोबर त्यांचे काही जुने फोटोही आहेत. यामध्ये रवी जाधव यांचा मुलगाही आजोबांबरोबर असल्याचे दिसत आहे. तसंच रवी जाधव यांच्या मुलांबरोबरचाही एक खास फोटो आहे. या भावुक व्हिडीओसह रवी जाधव यांनी असं म्हटलं आहे की, “पप्पा जाऊन चार वर्षे झाली, पण त्यांची आठवण प्रत्येक क्षणी येते. नक्की शब्दांत सांगता येणार नाही. पण मी त्यांची खूप आठवण येते”.
आणखी वाचा – 10 January Horoscope : मीन, कन्या, मेष या राशीच्या लोकांसाठी शुक्रवारचा दिवस शुभ, अधिक जाणून घ्या…
रवी जाधव यांच्या या व्हिडीओवर त्यांची पत्नी मेघना जाधवनेही “मिस यू पप्पा” अशी कमेंट केली आहे. शिवाय अनेक नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर भावुक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, ‘बालक पालक’, ‘टाइमपास’, ‘टाइमपास २’ आणि ‘ताली’ यांसारख्या अनेक चित्रपटांमुळे रवी जाधव यांनी मराठी सिनेसृष्टीत मानाचे स्थान मिळवले आहे. त्यांच्या ‘बॅन्जो’, ‘नटरंग’, ‘रंपाट’ या चित्रपटांनीसुद्धा प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले आहे.