बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

तेजश्री प्रधानच्या अचानक एक्झिटनंतर ‘प्रेमाची गोष्ट’च्या नव्या अभिनेत्रीची कामाला सुरुवात, मुक्ताची भूमिका साकारणार

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 10, 2025 | 1:33 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Premachi Goshta Marathi Serial

तेजश्री प्रधानच्या अचानक एक्झिटनंतर 'प्रेमाची गोष्ट'च्या नव्या अभिनेत्रीची कामाला सुरुवात, मुक्ताची भूमिका साकारणार

Premachi Goshta Marathi Serial : मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहऱ्यापैकी एक म्हणजे अभिनेत्री तेजश्री प्रधान. तेजश्री प्रधानने आजवर अनेक मालिकांमधून मध्यवर्ती भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. दर्जेदार व हिट मालिकांमधून तेजश्री नेहमीच घराघरांत पोहोचली. ‘होणार सून मी या घरची’ ही मालिका विशेष गाजली. याशिवाय तेजश्रीने अनेक हिट चित्रपटांमधूनही महत्त्वपूर्ण भूमिका करत प्रेक्षकांची मन जिंकली. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्रीचा तदैव लग्नम हा चित्रपट प्रदर्शित झाला. आता अभिनेत्री ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत मुक्ता ही मध्यवर्ती भूमिका साकारत होती. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री तेजश्री प्रधानने ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेतून एक्झिट घेतल्याच्या चर्चा सुरु आहेत.

अभिनेत्रीने अचानक मालिका सोडण्याचा निर्णय का घेतला याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण, तेजश्रीच्या ऐवजी आता मुक्ताच्या रुपात सेटवर नव्या अभिनेत्रीची एन्ट्री झाली असल्याचं समोर आलं आहे. तेजश्रीने मालिकेतून एक्झिट घेतल्यावर अभिनेत्री स्वरदा ठिगळे मुक्ताच्या भूमिकेत झळकणार असल्याचं बोललं जात होतं. अखेर स्वरदाने सेटवरचा पहिला फोटो शेअर करत या वृत्ताला दुजोरा दिला आहे. “नवीन वर्ष, नवीन सुरुवात” असं कॅप्शन देत अभिनेत्रीने मालिकेच्या स्क्रिप्टचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

आणखी वाचा – “पाठ, बरगड्यांना अजूनही गंभीर दुखापत अन्…”, भीषण कार अपघातानंतर उर्मिला कानिटकरची पहिली पोस्ट, सांगितला घटनाक्रम

स्वरदाने हा फोटो पोस्ट केला आहे त्यामधील या स्क्रिप्टमध्ये इंद्रा, लकी, मुक्ता यांची नावं स्पष्टपणे दिसत आहेत. यावरुन स्वरदाच मालिकेत मुक्ताचं पात्र साकारणार यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे. या मालिकेतून तेजश्रीने छोट्या पडद्यावर कमबॅक केलं. या मालिकेमुळे तेजश्रीला चाहत्यांचा विशेष प्रेम मिळालं. आणि टीआरपीच्या शर्यतीतही ही मालिका अव्वल असलेली पाहायला मिळाली. आता मात्र मालिकेतील तेजश्रीच्या एक्झिटमुळे तिचा चाहतावर्ग नाराज असल्याचं दिसतंय.

आणखी वाचा – “आशा आहे मी इथून बाहेर पडेन”, जीव वाचवण्यासाठी नोरा फतेहीला सोडावं लागलं लॉस एंजेलिस, म्हणाली, “भयानक परिस्थिती…”

यापुढे ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत मुक्ता ही भूमिका स्वरदा ठिगळे साकारणार आहे. अभिनेत्रीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर २०१३ मध्ये प्रसारित होणाऱ्या ‘माझे मन तुझे झाले’ या मालिकेमुळे ती प्रसिद्धीझोतात आली. २०१७ मध्ये तिने हिंदी मालिकेत काम केलं होतं. याशिवाय ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकेत स्वरदा प्रमुख भूमिकेत झळकली होती. आता लवकरच स्वरदा प्रेक्षकांना मुक्ताच्या भूमिकेत दिसेल.

Tags: Premachi Goshta Marathi Serialswarda thigaletejashri pradhan
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Salman Khan Skipped Asha Bhosle Funeral
Entertainment

Asha Bhosle Funeral : मुंबईत असूनही आशा भोसलेंच्या अंत्यसंस्काराला शाहरुख आणि सलमान खान का आले नाहीत?, कारण समोर…

एप्रिल 15, 2026 | 9:47 am
Next Post
Rashmika Mandanna Injured In Gym

जिममध्ये रश्मिका मंदानाला दुखापात, सलमान खानसह 'सिकंदर'चं शूट करताना घडली घटना, आता नेमकी परिस्थिती कशी?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.