शनिवार, मे 30, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

कुठे गायब झाली ‘तारक मेहता…’मधील अंजली भाभी?, आता फक्त देवभक्तीमध्ये आहे तल्लीन, नेमकं कसं जगत आहे आयुष्य?

Saurabh Moreby Saurabh More
जून 1, 2024 | 12:55 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah fame Anjali Bhabhi actress Neha Mehta what is doing? See the details

कुठे गायब झाली 'तारक मेहता...'मधील अंजली भाभी?, आता फक्त देवभक्तीमध्ये आहे तल्लीन, नेमकं कसं जगत आहे आयुष्य?

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’. या मालिकेची लोकप्रियता आजही कायम आहे. या मालिकेसह मालिकेतील कलाकारांनीही प्रेक्षकांच्या मनात आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. अशातच काही दिवसांपूर्वी या मालिकेतील अंजली भाभी म्हणजेच अभिनेत्री नेहा मेहताने अचानक मालिकेतून निरोप घेतला. तिच्या या मालिकेतेल  अचानक एक्झिटबद्दल आजही अनेक गुपिते आहेत. नेहा बऱ्याच दिवसांपासून मनोरंजन क्षेत्रापासून लांब आहे मात्र ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये अंजलीची भूमिका साकारणाऱ्या नेहा मेहताने ही मालिका सोडल्याच्या सहा महिन्यांनंतर तिच्या मालिका सोडण्याविषयीची कारण सांगितले होते. “मी खूप सन्माननीय जीवन जगते आणि कोणत्याही गोष्टीची तक्रार करण्यावर माझा विश्वास नाही. मी ‘तारक मेहता…’ ही मालिका सोडण्यापूर्वी १२ वर्षे अंजली म्हणून काम केले. पण माझे गेल्या सहा महिन्यांचे पैसे थकीत आहेत. मालिका सोडल्यानंतर मी त्यांना माझ्या थकबाकीबाबत अनेकदा फोन केला. मला तक्रार करायला आवडत नाही. आशा आहे की, यावर लवकरच तोडगा निघेल आणि मला माझे कष्टाचे पैसे मिळतील” असं म्हणत तिने मालिका सोडण्याचे कारण सांगितले होते.

View this post on Instagram

A post shared by Neha K Mehta (@mehta.neha.sk)

आणखी वाचा – ‘देवयानी’ व ‘गोठ’ या मालिकांमधून गाजलेल्या कलाकारांचे कमबॅक, नव्या मराठी मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार

नेहा मेहताने तारक मेहताच्या पत्नी अंजलीची भूमिका साकारली होती. २०२० मध्ये त्याने वैयक्तिक कारणे सांगून मालिकेतून निरोप घेतला होता. यावेळी तिने एका मुलाखतीत तिला आता नवीन माध्यम शोधायचे असल्याचे तिने सांगितले होते. तसेच नेहाने खुलासा केला होता की, तिला काही  नवीन संधी येत होत्या पण इतर कामामध्ये व्यस्त असल्यामुळे तिला ‘तारक मेहता…’ मालिकेतून प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लगला.

अंजलीला गेल्या अनेक वर्षात टीव्हीवर दुसरा कोणताही कार्यक्रम मिळाला नसेल, पण तिने यापूर्वी एक गुजराती चित्रपट केला आहे. तसेच ती तिच्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये व्यस्त असून ती टीव्ही व ओटीटीवरील काही चांगल्या संधीची वाट पाहत आहे.

आणखी वाचा – देवीआईच्या मंदिराजवळून दरीत पडलेला विरोचक पुन्हा परतणार, राजाध्यक्षांच्या घरी ऐकू आली किंचाळी, नेमका वध कधी होणार?

अंजलीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, सुरुवातीला ती न्यूयॉर्कमध्ये फिल्म मेकिंगचा अभ्यास करणार होती. पण जेव्हा तिला ‘तारक मेहता..’मधील अंजली भाभीच्या भूमिकेविषयी व मालिकेत अभिनय करण्याविषयी विचारण्यात आले तेव्हा तिने आपला विचार बदलला. तसेच ती आता देवभक्ती करत असल्याचेही तिच्या सोशल मीडियावरील फोटोमधून दिसून येते. त्यामुळे सर्वांची आवडती अंजली भाभी आता कोणत्या नवीन भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार? याकडे तिच्या चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Tags: Bollywood entertainment newsNeha MehtaTaarak Mehta Ka Ooltah Chashmah
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Tumbadchi Manjula Makarand Anaspure
Entertainment

‘तुंबाडची मंजुळा’मधील मकरंद अनासपुरेंचा लूक समोर, अभिनेत्याचा साधू अवतार चर्चेत

मे 30, 2026 | 5:08 pm
Gurmeet Choudhary Debina Bonnerjee
Entertainment

अनेक गर्भपात, सरोगसीद्वारे लेकीचा जन्म…; लग्नाच्या ११ वर्षांनी सुप्रसिद्ध अभिनेत्रीची आई होण्याची धडपड, नवऱ्याकडून खुलासा

मे 30, 2026 | 2:00 pm
Star Pravah Latest News
Entertainment

तीन महिन्यांत आठ नवेकोरे कार्यक्रम; स्टार प्रवाह वाहिनीची मोठी घोषणा, दिग्गज कलाकार झळकणार

मे 30, 2026 | 12:30 pm
 Rekha and Amitabh Bachchan
Entertainment

अभिनेत्यासह संध्याकाळ एकत्र घालवायला सुप्रसिद्ध अभिनेत्रीची भलतीच मागणी, खलनायकाचा खुलासा

मे 30, 2026 | 11:29 am
Next Post
Marathi actor Abhijeet Khandkekar shared a video of traffic jam on Thane-Ghodbunder road

Video : घोडबंदर रोडवरुन शूटला जात असताना मराठी कलाकारांचे हाल, गाड्या दोन-दोन तास एका जागी उभ्या अन्…; अभिनेत्याचा व्हिडीओ चर्चेत

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.