गेले काही दिवस ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मराठी मालिकेमध्ये अनेक उत्कंठावर्धक वळणं येत होती. रुपालीला विरोचकाने दिलेल्या शक्तीमुळे तिने राजाध्यक्ष कुटुंबातील सर्वांनाच तिच्या वशमध्ये केले होते. विरोचकाने राजाध्यक्ष कुटूंबातील केतकी काकु, फाल्गुनी, शेखर, तन्मय व तेजस या सर्वांना वश केले असल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र आता तिच्या वशमधून हे सगळेच जण बाहेर आले आहेत आणि घरातील सर्व जण पाचव्या पेटीचा शोध घेत आहेत. अशातच नुकत्याच झालेल्या भागात नेत्रा व इंद्राणी यांना पाचव्या पेटीचा शोध लागल्याचे पाहायला मिळाले.
नेत्रा व इंद्राणी यांना पाचव्या पेटीचा शोध लागला असून त्यांना विरोचकाचा अंत ज्या शस्त्राने करायचा आहे, त्या शस्त्राचा शोधही लागला असल्याचे पाहायला मिळाले. यामध्ये “अस्तिकट्यार वापरूनच विरोचकाचा अंत होऊ शकतो” असं म्हणते. यावर इंद्राणी नेत्राला “पण ही अस्तिकट्यार आहे कुठे?” असं म्हणते. यानंतर एका पेटीतून प्रकाश येतो व त्यातून अस्तिकट्यार दिसते. त्यामुळे अखेर विरोचकाचा अंत होणार? याची सर्वांना उत्सुकता लागली होती.
अशातच या मालिकेचा नुकताच आलेला एक व्हिडीओ प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. नेत्राचे बाबा नेत्राला फोन करून “हे सगळं वीपरीतच घडत आहे” असं म्हणतात. यावर नेत्रा त्यांना काही झालं आहे का?” असा प्रश्न विचरते. यावर नेत्राचे बाबा “देवीआईच्या खळाच्या डोंगरात विरोचक नाहीये” असं म्हणतात. यावर नेत्रा व अजिंक्यसह शेखर राजाध्यक्ष चिंतेत पडतात. त्यामुळे बाबांच्या काळजीने नेत्रा वावोशी गावाकडे निघायला जायला निघते. इतक्यात घरातून त्यांना एक मोठी किंचाळी ऐकू येते.
आणखी वाचा – ‘देवयानी’ व ‘गोठ’ या मालिकांमधून गाजलेल्या कलाकारांचे कमबॅक, नव्या मराठी मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार
त्यामुळे आता ही किंचाळी नक्की कुणाची आहे? विरोचक वावोशी गावात नाही तर मग आणखी कुठे गेला आहे? नेत्राच्या भीतीप्रमाणे विरोचकाने कुणाला काही इजा तर नाही केली ना? तसेच नेत्राच्या बाबांना व वावोशी गावकऱ्यांना विरोचक काही करणार का? हे आगामी भागांत पाहायला मिळणार आहे. याबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे.