गेली बरीच महिने सिनेसृष्टीत लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. एकामागोमाग एक कलाकार मंडळी लग्नबंधनात अडकत गेल्याच पाहायला मिळालं. मराठी सिनेसृष्टीत ही कलाकारांची लगीनघाई फारच लक्षवेधी ठरली. एकापाठोपाठ एक कलाकार लग्नबंधनात अडकत गेले. शिवानी सुर्वे, अजिंक्य ननावरे, मुग्धा वैशंपायन, प्रथमेश लघाटे, गौतमी देशपांडे, स्वानंदी टिकेकर, पूजा सावंत या मराठमोळ्या कलाकारांच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. या कलाकारांच्या शाही विवाहसोहळ्याच्या फोटोंनी अक्षरशः धुमाकूळ घातला होता. (Swarda Thigale Wedding)
या कलाकारांच्या यादीत आता आणखी एका अभिनेत्रीने नाव नोंदल आहे. टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री स्वरदा ठिगळे. ‘माझे मन तुझे झाले’, ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकांमधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री स्वरदा हिने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. स्वरदा आता तिच्या लग्नामुळे चर्चेत आली आहे. २६ मार्च राजी स्वरदा तिचा बॉयफ्रेंड सिद्धार्थ राऊतसह लग्नबंधणार अडकली.

जानेवारी महिन्यात स्वरदा व सिद्धार्थ यांचा साखरपुडा पार पडला. यानंतर आता अभिनेत्रीने इन्स्टाग्राम स्टोरीवर लग्नाचा फोटो शेअर करत तिच्या चाहत्यांना लग्न झाल्याची आनंदाची बातमी दिली. लग्नसोहळ्यासाठीच्या स्वरदाच्या लूकने साऱ्यांच्या नजरा वळविल्या. लग्नासाठी स्वरदाने पिवळ्या रंगाची नऊवारी साडी निवडली होती तर सिद्धार्थ लाल रंगाच्या कुर्त्यामध्ये दिसला. कपाळावर मुंडावळ्या बांधत दोघांचा हा शाही लूक साऱ्यांच्या पसंतीस पडला. अभिनेत्रीच्या लग्नसोहळ्याबरोबरच तिच्या हळदी समारंभातील फोटोही समोर आले.
स्वरदाचा नवरा हा पेशाने डिझाइनर आहे. स्वरदाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, २०१३ साली आलेल्या ‘माझे मन तुझे झाले’ या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. याशिवाय मराठीसह अभिनेत्री हिंदी मालिकाविश्वातही झळकली.