‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. बऱ्याच दिवसांपासून या चित्रपटाची सर्वत्र चर्चा रंगलेली पाहायला मिळत होती. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित असलेला या चित्रपटाकडे साऱ्यांचं लक्ष लागून राहील होतं. अशातच चित्रपट प्रदर्शित होताच या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन एक आठवडाही झाला नसून या चित्रपटाने प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळवलं आहे. अनेकजण चित्रपटाचं कौतुक करत आहे. बऱ्याच कलाकार मंडळींनीही चित्रपटाचं कौतुक करत चित्रपटासाठी खास पोस्ट शेअर केल्या आहेत. (Swatantryaveer Savarkar Movie Review)
रणदीप हुड्डा दिग्दर्शित या चित्रपटाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. तर रणदीपने चित्रपटात मुख्य भूमिकाही साकारलेली पाहायला मिळत आहे. तर अंकिता लोखंडे सावरकर यांच्या पत्नीच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. दोघांच्याही अभिनयाचं सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. दरम्यान, या चित्रपटाला मराठी कलाकारांचा पाठिंबा व उत्तम प्रतिसाद पाहायला मिळत आहे. सगळेचजण चित्रपट पाहिल्यानंतर कौतुक करताना दिसत आहेत, आणि चित्रपट पाहण्याचं आवाहनही करत आहेत.
गायिका मुग्धा वैशंपायने ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाविषयी आपलं मत मांडत असं म्हटलं की, “हा चित्रपट बघितला. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर या तेजस्वी सूर्याचं आयुष्य अवघ्या जगाला कळावं, त्यांनी आणि त्यांच्या पूर्ण कुटुंबाने आपल्या मातृभूमीसाठी केलेला त्याग, त्यांच्यावर झालेला परकोटीचा अन्याय, त्यांचं देशकार्य संपूर्ण जगाला कळावं, अशी गेले अनेक वर्ष खूप कळकळीची, तळमळीची इच्छा होती. आज या चित्रपटाच्या रुपाने सावरकर आणि त्यांचं ‘खरं’ कार्य, त्यांच्यावर झालेला अन्याय, हे सगळं संपूर्ण जगभरात अधिकाधिक पोहोचतंय याचा किती आनंद, अभिमान, समाधान वाटतंय काय सांगू. एका सावरकर भक्तासाठी हा खूप आनंदाचा क्षण आहे. रणदीप हुड्डा तुम्ही जे केलंय त्यासाठी फक्त आभार पुरेसे नाहीत. कृतज्ञता. वंदे मातरम्…”.
तर अभिनेत्री मेघा धाडे हिने देखील पोस्ट शेअर करत असं म्हटलं की, “प्रत्येक भारतीयाने हा चित्रपट पाहिलाच पाहिजे कारण हा चित्रपट नाही तर हे एक कटू सत्य आहे. जे अनेक दशकांपासून नाकारले गेले, हाताळले गेले, ट्विट केले गेले. कृपया तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट पहा आणि वस्तुस्थिती तुमच्या चेहऱ्यावर ठेवा. हा चित्रपट बनवल्याबद्दल रणदीप हुड्डा यांचे धन्यवाद. पिढ्यानपिढ्या यासाठी तुमचे आभारी राहतील”. तर अभिनेत्री गौतमी देशपांडे हिने देखील पोस्ट शेअर करत असं म्हटलं की, “कृपया जा आणि हा चित्रपट पहा. जेव्हा लोक टाळ्या वाजवत होते आणि ‘वीर सावरकर की जय’ असं म्हणत होते, तेव्हा अंगावर शहारे आले. मी खूप महिन्यांपासून या चित्रपटाची वाट पाहत होते”.