सध्या सर्वत्र लग्नाचा माहोल सुरू आहे. अशातच सिनेसृष्टीतही लग्नाचे वारे वाहू लागले आहेत. हिंदीसह मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकारमंडळी लग्नगाठ बांधत आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेता प्रसाद जवादे व अमृता देशमुख यांनी त्यांचा शाही विवाहसोहळा उरकला. त्यानंतर अभिनेत्री सुरुची अडारकर व अभिनेता पियुष रानडे यांच्या लग्नाचे अचानक फोटो समोर आले. याशिवाय सुप्रसिद्ध गायिका मुग्धा वैशंपायन हिच्या मोठ्या बहिणीचंही अत्यंत साधेपणाने लग्न झालं. (Swanandi Tikekar And Ashish Kulkarni Wedding)
सिनेसृष्टीत लग्नसोहळे सुरु असताना आणखी एक लोकप्रिय कपल विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा कित्येक दिवस सुरु होती. अभिनेत्री स्वानंदी टिकेकर व गायक आशिष कुलकर्णी हे लवकरच लग्न करणार आहेत. दोघांनी त्यांच्या नात्याची जाहीर कबुली सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. त्यानंतर अगदी थाटामाटात दोघांनी जवळचे मित्र व कुटुंबीयांच्या उपस्थितीत साखरपुडा सोहळा उरकला. चाहत्यांनीही या जोडीवर भरभरून प्रेम केलेलं पाहायला मिळालं.
अशातच आता ही जोडी लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं समोर आलं आहे. काही दिवसांपासून स्वानंदी व आशिष यांच्या केळवणाचे अनेक फोटो समोर आले. त्यांनतर ही जोडी लग्नबंधनात कधी अडकणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या होत्या. अशातच स्वानंदी व आशिष यांच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर समोर आली आहे. नुकतंच स्वानंदी व आशिषने त्यांच्या जवळच्या मित्रमंडळींसह एकत्र वेळ घालवला. त्यांच्यापैकी एकाने इंस्टाग्रामवरुन शेअर केलेली स्टोरी लक्ष वेधून घेत आहे.
स्वानंदी व आशिषने नुकतंच त्यांच्या जवळच्या मित्र-मैत्रिणींसह वेळ घालवला. यावेळी दोघांनी एकत्र रोमँटिक डान्सही केलेला पाहायला मिळत आहे. शिवाय त्यांच्या मित्र मैत्रिणींपैकी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिलेलं कॅप्शन अधिक लक्ष वेधून घेत आहे. या पोस्टमध्ये ‘#12daystogo ‘ असं कॅप्शन देण्यात आलं आहे. यावरून येत्या १२ दिवसांनी त्यांचं लग्न होणार असल्याचं समोर आलं आहे. त्यावरून येतंय २४ वा २५ डिसेंबरला या जोडीचं लग्न होणार असल्याची चिन्ह दिसत आहेत. स्वानंदी व आशिषच्या लग्नाकडे साऱ्यांच्याच नजरा लागून राहिल्या आहेत.