शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : स्वानंदी टिकेकर व आशिष कुलकर्णीचा रोमँटिक डान्स, लग्नाची तारीखही समोर, तयारीला जय्यत सुरुवात अन्…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 13, 2023 | 2:09 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Swanandi Tikekar And Ashish Kulkarni Wedding

Video : स्वानंदी टिकेकर व आशिष कुलकर्णीचा रोमँटिक डान्स, लग्नाची तारीखही समोर, तयारीला जय्यत सुरुवात अन्…

सध्या सर्वत्र लग्नाचा माहोल सुरू आहे. अशातच सिनेसृष्टीतही लग्नाचे वारे वाहू लागले आहेत. हिंदीसह मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकारमंडळी लग्नगाठ बांधत आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेता प्रसाद जवादे व अमृता देशमुख यांनी त्यांचा शाही विवाहसोहळा उरकला. त्यानंतर अभिनेत्री सुरुची अडारकर व अभिनेता पियुष रानडे यांच्या लग्नाचे अचानक फोटो समोर आले. याशिवाय सुप्रसिद्ध गायिका मुग्धा वैशंपायन हिच्या मोठ्या बहिणीचंही अत्यंत साधेपणाने लग्न झालं. (Swanandi Tikekar And Ashish Kulkarni Wedding)

सिनेसृष्टीत लग्नसोहळे सुरु असताना आणखी एक लोकप्रिय कपल विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा कित्येक दिवस सुरु होती. अभिनेत्री स्वानंदी टिकेकर व गायक आशिष कुलकर्णी हे लवकरच लग्न करणार आहेत. दोघांनी त्यांच्या नात्याची जाहीर कबुली सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. त्यानंतर अगदी थाटामाटात दोघांनी जवळचे मित्र व कुटुंबीयांच्या उपस्थितीत साखरपुडा सोहळा उरकला. चाहत्यांनीही या जोडीवर भरभरून प्रेम केलेलं पाहायला मिळालं.

आणखी वाचा – “मी माफी मागते पण…”, फसवणूकीनंतर इंग्रजी भाषेमध्ये संपूर्ण प्रकरण सांगताच आर्या आंबेकरवर भडकले नेटकरी, गायिका म्हणाली, “भावना दुखावल्या तरीही…”

अशातच आता ही जोडी लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं समोर आलं आहे. काही दिवसांपासून स्वानंदी व आशिष यांच्या केळवणाचे अनेक फोटो समोर आले. त्यांनतर ही जोडी लग्नबंधनात कधी अडकणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या होत्या. अशातच स्वानंदी व आशिष यांच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर समोर आली आहे. नुकतंच स्वानंदी व आशिषने त्यांच्या जवळच्या मित्रमंडळींसह एकत्र वेळ घालवला. त्यांच्यापैकी एकाने इंस्टाग्रामवरुन शेअर केलेली स्टोरी लक्ष वेधून घेत आहे.

आणखी वाचा – प्रसाद खांडेकरने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त बायकोला दिलं मोठं सरप्राइज, भारावून गेली अन्…; म्हणाला, “माझी तब्येत, तुझी तक्रार आणि…”

स्वानंदी व आशिषने नुकतंच त्यांच्या जवळच्या मित्र-मैत्रिणींसह वेळ घालवला. यावेळी दोघांनी एकत्र रोमँटिक डान्सही केलेला पाहायला मिळत आहे. शिवाय त्यांच्या मित्र मैत्रिणींपैकी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिलेलं कॅप्शन अधिक लक्ष वेधून घेत आहे. या पोस्टमध्ये ‘#12daystogo ‘ असं कॅप्शन देण्यात आलं आहे. यावरून येत्या १२ दिवसांनी त्यांचं लग्न होणार असल्याचं समोर आलं आहे. त्यावरून येतंय २४ वा २५ डिसेंबरला या जोडीचं लग्न होणार असल्याची चिन्ह दिसत आहेत. स्वानंदी व आशिषच्या लग्नाकडे साऱ्यांच्याच नजरा लागून राहिल्या आहेत.

Tags: ashish kulkarnientertainmentmarathi actressswanandi tikekarswanandi tikekar and ashish kulkarni wedding
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
marathi actress dancer megha ghadge shared video on Instagram and gave an update about her health

मेघा घाडगेवर रुग्णालयात सुरू होते उपचार, व्हिडीओ शेअर करत सांगितले आजाराचे कारण, म्हणाली, "हलगर्जीपणा झाला अन्..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.