Swanandi Tikekar and Ashish Kulkarni Marriage : मराठी मनोरंजन विश्वात सध्या लग्नाची चांगलीच धामधूम पाहायला मिळत आहे. मुग्धा -प्रथमेश, गौतमी -स्वानंद यांच्यानंतर आणखी एका मराठी सेलिब्रिटी जोडीनं लग्नगाठ बांधली आहे. मराठी सिनेसृष्टीत सध्या गौतमी-स्वानंद व स्वानंदी-आशिष यांच्या लग्नाची धामधूम पाहायला मिळत आहेत. अभिनेत्री, गायिका स्वानंदी टीकेकर व गायक आशिष कुलकर्णी हे दोघे गेले अनेक दिवस रिलेशनमध्ये होते. त्यानंतर आता या जोडीने त्यांच्या शाही थाटामाटात लग्नसोहळा उरकला आहे.
स्वानंदी व आशिष यांच्या लग्नाचे फोटोही दोघांनी शेअर केले आहेत. स्वानंदी ही अभिनेते उदय टिकेकर आणि गायिका आरती अंकलीकर यांची मुलगी आहे. आयुष्यभराची आनंदी साथ…असं म्हणत स्वानंदीनं लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. स्वानंदी व आशिषने त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर केल्यानंतर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
यानंतर स्वानंदीने लग्नात घेतलेला उखाणा सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. स्वानंदीने तिच्या लग्नासाठी खास उखाणा घेतला आहे. “मंगळसूत्राच्या दोन वाट्या, सासर-माहेरची खून, आशिषचं नाव घेते, कुलकर्णींची सून” असा उखाणा घेतला. यावर साऱ्यांनी तिचं कौतुक केलेलं पाहायला मिळाला. लग्नासाठी स्वानंदी व आशिष खूप खुश असलेले पाहायला मिळाले.
आणखी वाचा – मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटेचा असा पार पडला साखरपुडा सोहळा, फोटो आले समोर
स्वानंदीच्या लग्नातील लूकचंही सर्वत्र कौतुक करण्यात आलं. अत्यंत पारंपरिक अंदाजात त्यांचा विवाहसोहळा संपन्न झाला. स्वानंदी व आशिष यांनी मेहेंदी, संगीत सोहळ्यातील खास क्षण सोशल मीडियावर शेअर केले आहेत. शिवाय लग्नापूर्वीच्या विधींचे फोटोही या जोडीने पोस्ट केले होते. अभिनेत्रीच्या लग्नाला सिनेसृष्टीतील कलाकारांची मांदियाळीही पाहायला मिळाली. स्वानंदी-आशिषच्या संगीत सोहळ्यातही त्यांनी धमाल मस्ती केली. स्वानंदीच्या आई वडिलांचा लेकीच्या लग्नसोहळ्यातील डान्सही विशेष व्हायरल झाला.