शनिवार, मे 30, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

चव्हाणांच्या घरी रमली नवी सूनबाई, लग्नानंतर सूरज चव्हाणचा सुखी संसार, बायकोबरोबर लग्नानंतरचे खेळ खेळण्यात दंग

Majja Webdeskby Majja Webdesk
डिसेंबर 1, 2025 | 2:56 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Suraj Chavan Wedding Ritual

लग्नानंतर सूरज चव्हाणचा सुखी संसार

Suraj Chavan Wedding Ritual : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण याचा २९ नोव्हेंबर रोजी लग्नसोहळा पार पडला. त्याने आपल्या लहानपणीची खास मैत्रीण संजनासह सात जन्मांची गाठ बांधली. नातेवाईक, मित्रमंडळी आणि सेलिब्रिटींच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. लग्नानंतर आता त्यांच्या घरी सुरू झालेल्या पारंपरिक विधींचीही मोठ्या प्रमाणात चर्चा रंगत आहे. लग्नानंतरच्या पहिल्याच दिवशी सूरज आणि संजनाने एक विशेष विधी पार पाडली. पाण्यात अंगठी शोधण्याचा खेळ दोघांनीही खूप मजेत एन्जॉय केला. यावेळी हशा-मस्करी रंगली होती. हळद उतरवताना सूरजच्या चेहऱ्यावर खूप आनंद दिसत होता. समारंभातील हे क्षण आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

दरम्यान, दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये सूरज-संजना जेजुरीला खंडेरायाच्या दर्शनासाठी गेलेले दिसले. परंपरेनुसार नवऱ्याने नवरीला उचलून पायऱ्या चढण्याची प्रथा आजही जेजुरीत पाळली जाते. ही प्रथा पार पाडताना सूरजने संजनाला उचलून पायऱ्या चढताना दिसत होता. दोघांनीही देवदर्शन घेतले असून या क्षणांचे अनेक व्हिडीओ चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाले आहेत.

आणखी वाचा – बायकोला पाहायला उतावळा झालाय सोहम बांदेकर, मेहंदीचे फोटो शेअर करत पूजाला म्हणाला, “तयार राहा…”

View this post on Instagram

A post shared by Bhagyashri Bhushan Oimbe◉⁠‿⁠◉ (@bhagyashri_oimbe.04)

सध्या सोशल मीडियावर या नव्या जोडप्याचे सर्वच व्हिडीओ आणि फोटो मोठ्या प्रमाणात शेअर होत आहेत. हळद उतरवण्यापासून देवदर्शनापर्यंत दोघांच्या चेहऱ्यावरचा समाधानाचा आणि आनंदाचा भाव स्पष्टपणे दिसत आहे. चाहत्यांनाही या जोडीचे हे आनंदमय क्षण पाहून भरभरून प्रेम दिल आहे.

आणखी वाचा – लग्नात गैरहजर पण…; लग्नानंतर लाडक्या भावाला अंकिता वालावलकरचा सल्ला, म्हणाली, “जीवनात कितीही बदल झाले तरी…”

लग्नाबद्दल बोलायचं झालं तर सूरज आणि संजनाचे हे लग्न लव्ह मॅरेज आहे. संजना ही सूरजच्या मामाची मुलगी असून दोघांचे नाते अनेक वर्षांच्या ओळखीवरून प्रेमात बदलले. त्यांच्या लग्नाला धनंजय पोवार आणि जान्हवी किल्लेकर अशा अनेक कलाकारांनी उपस्थित राहून या सोहळ्याची शोभा वाढवली.

Tags: marathi entertainment newssuraj chavan weddingSuraj Chavan Wedding Ritual
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Tumbadchi Manjula Makarand Anaspure
Entertainment

‘तुंबाडची मंजुळा’मधील मकरंद अनासपुरेंचा लूक समोर, अभिनेत्याचा साधू अवतार चर्चेत

मे 30, 2026 | 5:08 pm
Gurmeet Choudhary Debina Bonnerjee
Entertainment

अनेक गर्भपात, सरोगसीद्वारे लेकीचा जन्म…; लग्नाच्या ११ वर्षांनी सुप्रसिद्ध अभिनेत्रीची आई होण्याची धडपड, नवऱ्याकडून खुलासा

मे 30, 2026 | 2:00 pm
Star Pravah Latest News
Entertainment

तीन महिन्यांत आठ नवेकोरे कार्यक्रम; स्टार प्रवाह वाहिनीची मोठी घोषणा, दिग्गज कलाकार झळकणार

मे 30, 2026 | 12:30 pm
 Rekha and Amitabh Bachchan
Entertainment

अभिनेत्यासह संध्याकाळ एकत्र घालवायला सुप्रसिद्ध अभिनेत्रीची भलतीच मागणी, खलनायकाचा खुलासा

मे 30, 2026 | 11:29 am
Next Post
soham bandekar wedding

Video : आदेश बांदेकर व सुचित्रा बांदेकरच्या लेकाच्या हळदीत मराठी कलाकारांचा तुफान राडा, जबरदस्त डान्स अन्…; व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.