soham bandekar wedding : बरेच दिवसांपासून आदेश बांदेकर-सुचित्रा बांदेकर यांच्या लेकाच्या म्हणजेच सोहम बांदेकरच्या लग्नाची चर्चा सुरु असलेली पाहायला मिळाली. सोहम अभिनेत्री पूजा बिरारीसह लग्नबंधनात अडकणार आहे. आणि त्याच्या लग्नाची धामधूम सुरु असलेली पाहायला मिळत आहे. आज २ डिसेंबरला सोहम व पूजा लग्नबंधनात अडकणार आहेत. काल सोहम व पूजा यांचा हळदी समारंभ आणि संगीत सोहळा अगदी थाटामाटात पार पडला. पूजा व सोहमच्या हळदीला अनेक कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली. इतकंच नाहीतर संगीत सोहळ्यातही अनेकांची धमाल-मस्ती पाहायला मिळाली.
सोहम-पूजाच्या हळदीला मराठी सिनेविश्वातील अनेक कलाकार मंडळी उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं. हळदी समारंभाचे समोर आलेल्या व्हिडीओमध्ये मराठी कलाकारांची झलक पाहायला मिळाली. यावेळी अनेक कलाकार मंडळी सोहम व पूजाला आशीर्वाद द्यायला उपस्थित होते. पूजा-सोहमचा हा लग्नसोहळा मुंबई येथे नाहीतर लोणावळाला पार पडत आहे. यावेळी सुमीत राघवन, सचित पाटील, अभिजीत केळकर, ऋजुता देशमुख, दिपाली विचारे, सुकन्या मोने ही कलाकार मंडळी उपस्थित होती.
हळदीला सोहम व पूजाची जबरदस्त एंट्रीही पाहायला मिळाली. शिवाय दोघेही त्यांच्या मित्र-परिवारासह मन मोकळेपणाने थिरकताना दिसले. यावेळी दोघांच्या कुटुंबीयांनीही ठेका धरलेला पाहायला मिळाला. इतकंच नाहीतर संगीत सोहळ्यातही सोहम-पूजाचा रोमँटिक डान्स साऱ्यांच्या पसंतीस पडला. तर लेकाच्या लग्नात आदेश व सुचित्रा ही जोडीही थिरकताना दिसली. आणि भलताच भाव खाऊन गेली.
आणखी वाचा – बायकोला पाहायला उतावळा झालाय सोहम बांदेकर, मेहंदीचे फोटो शेअर करत पूजाला म्हणाला, “तयार राहा…”
सोहम सध्या ‘घरोघरी मातीच्या चुली’ आणि ‘ठरलं तर मग’ या दोन मालिकांचा निर्माता म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. तर पूजा बिरारी सध्या ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. या टीमने तिचं केळवण सुद्धा केलं होतं. आणि याचे व्हिडीओ तुफान व्हायरल झालेले पाहायला मिळाले.





