Suraj Chavan Reel Video : ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ च्या विजेतेपदावर सूरज चव्हाणने आपलं नाव कोरलं. सूरज चव्हाणच सध्या सर्वत्र कौतुक होताना पाहायला मिळत आहे. कायमच सूरजने त्याच्या स्वभावाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. टिकटॉकमुळे सूरजला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. मात्र टिकटॉक बंद झाल्यानंतर सूरज सोशल मीडियावर फार कमी झळकला. त्यानंतर त्याला ‘बिग बॉस मराठी’ सारखा खूप मोठा प्लॅटफॉर्म मिळाला. या मिळालेल्या मोठ्या संधीच त्याने सोनं केलं आणि त्याने प्रत्येकाच्या मनात घर केलं. संबंध महाराष्ट्रातून सूरज चव्हाणच भरभरुन कौतुक होताना पाहायला मिळत आहे. अशातच आता पुन्हा एकदा सूरजने व्हिडीओ बनवून पोस्ट करायला सुरुवात केली आहे.
‘बिग बॉस मराठी’नंतर आता पुन्हा एकदा सूरज रील व्हिडीओ बनवून पोस्ट करु लागला आहे. त्याचे हे व्हिडीओ पाहून अनेकांनी त्याच्या कमबॅकच कौतुक केलं आहे. तर काहींनी सूरजचे हे व्हिडीओ पाहून नापसंती दर्शविली आहे. आता सूरजने मोठी काम करावीत, त्याने असे व्हिडीओ करु नये, मिळालेल्या संधीच सोनं करत त्याने चांगलं काम करावं असं अनेकांचं म्हणणं असल्याचं त्याने पोस्ट केलेल्या कमेंटवरुन दिसत आहे.
आणखी वाचा – ‘लाखात एक…’ फेम नितीश चव्हाण भावाला घट्ट मिठी मारुन स्टेजवरच रडला, पायाही पडला अन्…; भावुक व्हिडीओ समोर
सूरजने शेअर केलेल्या रील व्हिडीओवर, “आता काहीतरी उद्योग धंदा काढ. सूरज जेणेकरुन तुझा चरितार्थ चालेल, चार पैसे तुझ्या गाठीशी पडतील, तू आर्थिकरित्या सक्षम होशील हे झाल्यावर मग तू रीलस बनव”, “सूरज कृपया असले व्हिडीओ बनवू नकोस तू पहिल्यासारखा आता राहिला नाहीस”, “असले व्हिडीओ तुला आता शोभून दिसत नाहीत. तर कृपया असले व्हिडीओ करणं बंद कर. ‘बिग बॉस’ विजेता आहेस तू भावा. मग लोकं अजून ट्रोल करतील. बंद कर. तुला आता शोभत नाही”, “कृपया सूरजच्या जवळचे, कोणी गावातील लोक आहेत, किंवा हे अकाउंट हॅण्डल करणारे जे लोक आहेत त्यांनी त्याच्या करिअरच नुकसान करु नका. त्याने खूप मेहनतीने यश खेचून आणलं आहे ते मातीत मिळवू नका”, अशा कमेंट केल्या आहेत.
तर सूरजने अभिजीत सावंतच्या गाण्यावरही एक सुंदर अशी व्हिडीओ बनवली आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी असं म्हटलं आहे की, “तुझं व्यक्तिमत्व बदललं आहे. असे व्हिडीओ बनवून स्वतःची ईमेज खराब करु नको. लोकांना आता तुला मोठ्या पडद्यावर बघायचे आहे”, “अभिजीत सावंतची आठवण येतेय का?”, “अभिजीत सावंत जेव्हा पहिल्यांदा इंडियन आयडल झाला होता तेव्हा हे गाणंही खूप गाजलं होतं. आज सूरजने त्या गाण्यावर पुन्हा एकदा व्हिडीओ बनवला. आठवणी ताज्या झाल्या”.