झी मराठी पुरस्काराचे यंदाचे २५ वे वर्ष आहे. यावर्षीचे पुरस्कार विशेष आहेत. कारण, ते झी मराठीच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा आहेत. झी मराठी वाहिनीने गेली दोन दशकं मराठी संस्कृती आणि परंपरा जपण्यात महत्वपूर्ण योगदान दिलं आहे आणि हे वाहिनीवर प्रसारीत झालेल्या मालिकांमधून पाहायला मिळते. या वाहिनीला २५ वर्षे पूर्ण होत असल्याने हा यंदाचा ‘झी गौरव पुरस्कार २०२४’ हा सोहळा खास असून येत्या २६ व २७ ऑक्टोबर असे दोन दिवस प्रसारित केला जाणार आहे. या सोहळ्याला यावर्षी जुन्या मालिकांचे कलाकारदेखील उपस्थित राहणार आहेत. (Raqesh Bapat Emotion)
सध्या या पुरस्कार सोहळ्याचे अनेक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशाच एका भावुक प्रोमोने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ज्यामध्ये राकेश बापट आपल्या आईला पाहून भावुक झाल्याचे पाहायला मिळत आहे. झी गौरवच्या मंचावर आपल्या आईला पाहून अभिनेता राकेश बापट भावुक झाला आणि त्याने आईला घट्ट मिठीदेखील मारली. राकेश बापट सध्या ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. ही मालिका त्याने आपल्या आईच्या इच्छेखातर स्वीकारली होती.
आणखी वाचा – बायकोसह नवऱ्याचाही गौरव, शिवानी रांगोळे व विराजसचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, “घरी ट्रॉफी घेऊन जाताना…”
राकेश मराठी मालिकेच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला यावा अशी त्याच्या आईची इच्छा होती. आईची हीच इच्छा पूर्ण करण्यासाठी राकेशने या मालिकेत काम करण्यासाठी हो म्हटलं होतं. याबद्दल त्याने याआधी अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे. याचबद्दल राकेशच्या आईने असं म्हटलं की, “मी त्याला म्हटलं होतं की, तू आता मराठी मालिका कर, कारण मला तू रोज पाहायचं आहे”. यावर राकेशने असं म्हटलं की, “आईची माया ही आईचीच माया असते”. झी मराठीच्या पुरस्कार सोहळ्याचा हा प्रोमो साध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
आणखी वाचा – ‘लाखात एक…’ फेम नितीश चव्हाण भावाला घट्ट मिठी मारुन स्टेजवरच रडला, पायाही पडला अन्…; भावुक व्हिडीओ समोर
दरम्यान, राकेशच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘तू आशिकी’, ‘बात हमारी पक्की है’, ‘कुबूल है’, ‘नच बलिए ६’ अशा अनेक हिंदी मालिकांमध्ये त्याने काम केलं आहे. तसेच ‘वो तुम बिन’, ‘दिल विल प्यार व्यार’, ‘कुछ दिल ने कहा’, ‘कोई मेरे दिल में है’ यांसारख्या चित्रपटात तो झळकला आहे. सध्या तो ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील एजेंच्या भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.