बॉलिवूड अभिनेता सनी देओल सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘गदर २’ साठी व्यस्त आहे. ‘गदर २’ हा चित्रपट ११ ऑगस्ट २०२३ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. अशातच अभिनेता सनी देओल वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. सनी देओलने ड्रग्ज विरुद्ध बॉलिवूड वादावर एका मुलाखतीत केलेल्या वक्तव्यावरून हा भडका उडाला आहे.
इंडस्ट्रीला पाठिंबा देताना तो म्हणाला की, “कमतरता बॉलिवूडमध्ये नाही तर बॉलिवूडच्या माणसांमध्ये आहे. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर इंडस्ट्रीत ड्रग्ज प्रकरणाची अनेक मोठी प्रकरणेही समोर आली होती. अनेक बड्या कलाकारांची चौकशी झाली आणि बऱ्याच कलाकारांना पोलीस कोठडीची देखील सामना करावा. ड्रग्ज प्रकरणावरून ‘बी टाऊन’मध्ये वातावरण तापलेलं पाहायला मिळत. (Sunny Deol on Drugs)
पाहा ड्रग्ज प्रकरणावरून सनी देओल काय म्हणाला (Sunny Deol on Drugs)
अशातच सनी देओलने ‘आज तक’च्या ‘सीधी बात’ या कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत ड्रग्जमुळे होणाऱ्या बॉलीवूडच्या बदनामीवर भाष्य केलं आहे. तो म्हणाला, ‘हे घाणेरडं बॉलीवूड नाही, तर इथली माणसं घाणेरडी आहेत. आणि हा प्रकार कोणत्या क्षेत्रात नाही आहे, असं शक्य नाही. आम्ही ग्लॅमरच्या दुनियेत वावरतो म्हणून आमच्यावर प्रत्येकवेळी बोट दाखवलं जातं.”

यापूर्वी ‘डेक्कन क्रॉनिकल’ला दिलेल्या मुलाखतीत सनी देओलने सांगितले होते की, “तो आयुष्यभर दारू, ड्रग्स आणि पार्टी करण्यापासून दूर राहिला. त्याला शिस्त पाळणं फार आवडत. आणि असं केल्याने निरोगी आयुष्य लाभत.” सनी देओल हा त्यांच्या कुटुंबातील सर्वात मोठा मुलगा आहे. अशा स्थितीत बॉबी देओलपासून चुलत भाऊ अभय देओलपर्यंत सर्वांकडे त्याला लक्ष द्यावं लागत.
ड्रग्ज प्रकरणावरून मध्यंतरी चर्चेत असलेला विषय म्हणजे शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान. ऑक्टोबर २०२१ मध्ये कॉर्डेलिया क्रूझ जहाजावर छापा टाकल्यानंतर आर्यन खानला अटक करण्यात आली होती. अमली पदार्थांच्या प्रकरणात त्यांना सुमारे चार आठवडे लॉकअपमध्ये काढावे लागले. मात्र, नंतर तो जामिनावर बाहेर आला आणि काही दिवसांनी आर्यन खानला एनसीबीच्या आरोपपत्रात क्लीन चिट देखील मिळाली.