प्रत्येक कलाकार हा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी कायम तत्पर असतो. पण कलाकारांसमोर जेव्हा मानधनाचा प्रश्न येतो, तेव्हा अनेक वादग्रस्त मुद्दे आपल्याला ऐकायला मिळतात. एकाला जास्त तर दुसऱ्याला कमी किंवा थकलेले मानधन, असे अनेक मुद्दे नेहमीच कानावर ऐकू येतात. (Isha Keskar opinions Equal Payment in Marathi Film Industry)
अशातच मराठी चित्रपटसृष्टीत महिला कलाकारांना मिळणाऱ्या मानधनाबद्दल अभिनेत्री ईशा केसकर स्पष्टच बोलली. दरम्यान तिने महिला व पुरुष कलाकारांना चित्रपट क्षेत्रात मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीबद्दल नुकतंच एका मुलाखतीत भाष्य केलं.
काय म्हणाली ईशा केसकर ? (Isha Keskar opinions Equal Payment in Marathi Film Industry)
अभिनेत्री ईशा केसकर यावर बोलताना म्हणाली, “मराठी चित्रपटसृष्टीमध्ये महिला व पुरुष कलाकारांच्या मानधनाच्या बाबतीत हा भेदभाव कायम दिसून येतो आणि तो अजूनही आहे. हिरोला वेगळे पैसे, हिरोईनला वेगळे पैसे असा भेदभाव जो केला जातो, तो अजूनही केला जातो.
हे देखील वाचा – सिनेसृष्टीमध्ये स्त्रियांना मिळणाऱ्या वागणुकीविषयी सई ताम्हणकरचा मोठा खुलासा म्हणाली, “पुरुषांचं यश..”
पुढे बोलताना ईशा म्हणते, “प्रॉडक्शन हाऊसवाले आम्हाला समान मानधन देण्याचं बोलतात. पण खरं बोलायला गेलं तर ते तसं नाही करत. आज एक अभिनेत्री म्हणून मी जेव्हा इतर महिलांचे प्रतिनिधित्व करते. तेव्हा या पैशांमुळे केला जाणारा फरक जाणवतो. आम्हाला ती एक छोटी पायरी दिल्यासारखी वाटते. त्यामुळे त्याचा परिणाम आम्हा महिला कलाकारांसह संपूर्ण युनिटच्या मानसिकतेवर होतो. त्यांच्या मनात आम्ही अभिनेत्री आहोत. पण पुरुष अभिनेता जास्त महत्त्वाचा आहे, असा विचार येतो. त्यामुळे हे ठामपणे सांगेन की, मला कधीच समान मानधन दिले गेले नाही. पण द्यावं, असं मला वाटतंय.” याच मानधनाच्या मुद्द्यावर याआधी अभिनेत्री सई ताम्हणकरने एका कार्यक्रमात उत्तर दिले होते, ज्याची सर्वत्र चर्चा झाली होती.
हे देखील वाचा – ऋषी सक्सेना व ईशा केसकर अडकणार लग्नबंधनात, साधेपणाने उरकणार लग्न, अभिनेत्री म्हणाली, “थाटामाटत लग्न करण्याची…”
छोट्या पडद्यापासून आपल्या अभिनयाला सुरुवात करणारी अभिनेत्री ईशा केसकर आज नावाजलेल्या अभिनेत्रींमध्ये ओळखली जाते. ‘जय मल्हार’, ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत दिसलेली ईशा ‘सरला एक कोटी’ चित्रपटातही दिसली होती, ज्यात तिने साकारलेल्या भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले होते. शिवाय सोशल मीडियावरही फारच सक्रिय असून ती तिचे अनेक फोटोज व व्हिडिओस शेअर करत नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहते. (Isha Keskar opinions Equal Payment to Male and Female Actors in Marathi Film Industry)