सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

ऐतिहासिक चित्रपटात मृणाल कुलकर्णींसह लेक व सूनही काम करताना दिसणार, म्हणाल्या, “आमचं कुटुंब…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 5, 2023 | 4:44 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Historical Movie Update

Historical Movie Update

अशी बरीच कुटुंब आहेत जी सिनेमासृष्टीत काम करताना पाहायला मिळतात. असंच एक कुटुंब आहे, जे एकत्र एकाच चित्रपटात काम करताना पाहायला मिळणार आहे. आई, मुलगा व सून अशा तिघांनी एकाच चित्रपटात काम केलं आहे. अभिनय, लेखन, दिग्दर्शन अशा तीनही माध्यमातून कलेचा वारसा समर्थपणे जपत रसिकांचे मनोरंजन करणारे, कलेत रमणारे असेच एक कुटुंब आगामी ‘सुभेदार’ या चित्रपटात एकत्र पाहायला मिळणार आहे. प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, त्यांचा मुलगा विराजस कुलकर्णी आणि त्याची पत्नी शिवानी रांगोळे हे तिघंही पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. (Historical Movie Update)

‘सुभेदार’ या आगामी चित्रपटात मृणाल कुलकर्णी जिजाऊ आईसाहेबांच्या, विराजस जीवाच्या भूमिकेत पहायला मिळणार असून यशोदाबाई मालुसरेच्या भूमिकेत शिवानी रांगोळे दिसणार आहे. तर हे कुलकर्णी कुटुंब सुभेदार या चित्रपटासाठी एकत्र आलं आहे. आपल्या आजोबांकडून मिळालेला इतिहासाचा वारसा जपत मृणाल कुलकर्णी यांनी वेगवेगळ्या ऐतिहसिक भूमिकांमधून आपला ठसा उमटवला आहे.

पाहा कोणत्या चित्रपटात झळकणार मृणाल कुलकर्णींसोबत त्यांची लेक व सून (Historical Movie Update)

“‘सुभेदार’ या चित्रपटात तान्हाजी मालुसरे यांना कुटुंबाने कशी मोलाची साथ दिली, हे पाहायला मिळणार असून या चित्रपटाच्या निमित्ताने आमचं कुटुंबही एकत्र आल्याचा आनंद वेगळा आहे” असं मृणाल कुलकर्णी यांनी म्हटलं आहे. 

हे देखील वाचा – दादा कोंडकेंचे ‘हे’ जुबली स्टार चित्रपट दाखवण्यावर उषा चव्हाण यांचा आक्षेप; उपमुख्यमंत्र्यांकडे केली तक्रार

सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या असीम शौर्याची गाथा उलगडणारा दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित ‘सुभेदार’ चित्रपट १८ ऑगस्टला चित्रपटगृहात येणार आहे. ‘ए.ए.फिल्म्स’ आणि ‘एव्हरेस्ट एंटरटेनमेंट’ची प्रस्तुती असलेल्या ‘सुभेदार’ चित्रपटाची निर्मिती ‘राजवारसा प्रोडक्शन’, ‘मुळाक्षर प्रोडक्शन’, ‘पृथ्वीराज प्रोडक्शन’, ‘राजाऊ प्रोडक्शन’, ‘परंपरा प्रोडक्शन’ यांनी केली आहे. प्रद्योत  पेंढारकर, अनिल वरखडे,  दिग्पाल लांजेकर, चिन्मय मांडलेकर, श्रमिक गोजमगुंडे, विनोद जावळकर, शिवभक्त अनिकेत जावळकर, श्रुती दौंड हे ‘सुभेदार’ चित्रपटाचे निर्माते आहेत.

Tags: historical moviemrinal kulkarnishivani rangolevirajas kulkarni
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Sunny Deol on Drugs

Sunny Deol on Drugs : “आम्ही लोक…” ड्रग्जमुळे बॉलिवूड बदनाम झाल्याचं विचारताच सनी देओलचा राग अनावर, म्हणाला, “घाणेरडं बॉलिवूड…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.