Kajol Devgan Birthday : बॉलीवूड असो किंवा मराठी चित्रपटसृष्टी अनेक कलाकार आपल्या अभिनयाच्या जोरावर ती समृद्ध करत असतात. अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनापासून मनोरंजन करणारी एक अभिनेत्री म्हणजे काजोल. आज काजोलचा ४९ वा वाढदिवस त्या निमित्त जाणून घेऊयात काजोलच्या आयुष्यतील काही महत्वाच्या घटना. आज चित्रपटसृष्टीतील नामांकित अभिनेत्री म्हणून काजोलच नाव घेतलं जातं. ‘कुछ कुछ होता है’, ‘कभी ख़ुशी कभी गम’, ‘बाजीगर’, ‘फना’ अशा अनेक चित्रपटांमध्ये अभिनय करून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे आणि अजूनही प्रेक्षकांना भुरळ पाडणारा तिचा अभिनय सुरूच आहे. बॉलीवूड मधील सुप्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेते अजय देवगण सोबत काजोल विवाह बंधनात अडकली आणि या कलाकार जोडीचं वैवाहिक जीवन सुरु झालं. काजोलने दिलेल्या एका मुलाखतीनुसार अजय आणि तिच्या प्रेमकहाणीत सुरुवातीला अनेक अडचणी येत होत्या.(Kajol Devgan Miscarriage)
काजोलने मुलाखतीत सांगितलं होतं अजय यांच्या घरातून या लग्नाला सहमती होती परंतु काजोलच्या वडिलांना हे लग्न मान्य न्हवतं. लग्नाच्या बातमी नंतर ४ दिवस ते काजोलसोबत बोलले ही न्हवते कारण त्यांचं असं म्हणणं होतं कि काजोलने आधी करिअर वर लक्ष द्यायला हवं. पुढे काजोलने सांगितलं “आम्ही आमच्या लग्नाची जागा मीडियाला चुकीची सांगितली आणि आम्ही दुसऱ्याचं ठिकाणी लग्न केलं कारण आम्हाला हा संपूर्ण दिवस केवळ आमच्यासाठी हवा होता.

दोनवेळा गर्भपात आणि… (Kajol Devgan Miscarriage)
आज देवगण कुटुंब संपूर्णपणे आनंदित असलं तरीही काही वर्षांपूर्वी काजोलच्या आयुष्यात काही अशा घटना घडल्या होत्या ज्यामधून तिला सावरायला वेळ लागला. अजय-काजोल यांनी लग्नाच्या एका ठराविक कालावधी नंतर मुलाबाळांचा विचार केला. ‘कभी ख़ुशी कभी गम’ या चित्रपटाच्या वेळी काजोल प्रेग्नन्ट देखील होती पण त्यावेळी तिचा गर्भपात झाला आणि तिला निराशेचा सामना करावा लागला होता. त्या नंतर पुन्हा एकदा काजोलला या अडचणीचा सामना करावा लागला होता. कलाकांतराने काजोल व अजय यांच्या आयुष्यात निसा व युग या लेकराचं आगमन झालं आणि देवगण कुटुंब आनंद वास्तव्य करू लागलं.(kajol devgan family)
हे देखील वाचा- “मराठी माणसाला कोणी मोठं झालेलं बघवत नाही”, नितीन देसाईंच्या मृत्यूनंतर सुबोध भावेचं मोठं वक्तव्य, म्हणाला, “तो इथे…”
काजोलने या आठवणींबाबत आणखी एक आठवण काजोलने प्रेक्षकांसोबत शेअर केली होती. एका चित्रपटाच्या शुटिंगवेळी काजोलचा अपघात झाला होता त्यावेळी ती चक्कल अजयला देखील ओळखत न्हवती. तर घडलं असं होतं कि ‘ये लाडका है दिवाना’ या गाण्याचं शुटिंग सुरु असताना सायकल चालवताना काजोल पडली आणि तिच्या डोक्याला जबर मार लागला. दिग्दर्शक करण जोहर यांच्या माहितीनुसार या घटनेनंतर काजोलने मॉरिशिसच्या घरात स्वतःला कोंडून घेतलं आणि बरेच दिवस ती रडत देखील होतं. एवढंच नाही तर ती अजय देवगण कोण आहेत हे देखील विसरली होती.