अभिनेत्री सुप्रिया पाठारे या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहेत. छोट्या पडद्यावरील अभिनेत्रींच्या यादीत सुप्रिया पाठारे हे नाव विसरून चालायचं नाही. मालिकाविश्वात सुप्रिया पाठारे यांचा विशेष दबदबा असलेला पाहायला मिळतो. सोशल मीडियावरही सुप्रिया या बऱ्यापैकी सक्रिय असतात. आणि नेहमीच त्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न ही करतात. आता सुप्रिया पाठारे एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आल्या आहेत, ते म्हणजे त्यांच्या लेकाने आणि त्यांनी मिळून सुरु केलेल्या व्यवसायासाठी. सुरुवातील फूड ट्र्क पासून सुरु केलेल्या या व्यवसायाने हॉटेल पर्यंत धाव घेतली आहे. लेकाने आणि आईने पाहिलेलं हे स्वप्न पूर्ण झालं आहे. (Supriya Pathare New Hotel)
नुकताच, सुप्रिया पाठारे यांच्या लेकाच्या हॉटेलचा उद्घाटन सोहळा दणक्यात पार पडला. ठाणे येथे त्याने ‘मharaj’ पावभाजी आणि फास्ट फूड कॉर्नर सुरू केलं आहे. या त्याच्या नवीन हॉटेलचे उद्घाटन अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांच्या हस्ते करण्यात आलं. हर्षदा खानविलकर तसेच ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेतील कलाकार आणि अंशुमन विचारे आणि त्याच कुटुंबीय या सर्वानी उदघाटन सोहळ्याला हजेरी लावली.
पाहा ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेतील कलाकार काय म्हणाले (Supriya Pathare New Hotel)
पाहा हर्षदा खानविलकर काय म्हणाली (Supriya Pathare New Hotel)
हर्षद खानविलकर यांच्या हस्ते हॉटेलचं उद्घाटन झालं, त्यानंतर त्यांनी हॉटेलमधील विविध पदार्थांचाही आस्वाद घेतला. विशेष म्हणजे हे सगळे पदार्थ त्यांना खूप आवडले. हर्षदा यांनी त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीला अभिनेत्री सुप्रिया पाठारे आणि लेक मिहीर पाठारे यांच्यासोबतचा एक फोटो पोस्ट केला आणि त्याखाली त्यांनी कॅप्शन देत लिहिलं होतं की, ““या हॉटेलमधील सर्व पदार्थांची चव उत्तम आहे. ठाण्यातील टेस्टी व्हेज पदार्थ… खूप शुभेच्छा!”
हे देखील वाचा – स्पृहा जोशीच्या बहिणीची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद, म्हणाली, “भारताचं नेतृत्व..”
शिवाय ‘इट्स मज्जा’च्या व्हिडिओमध्येही त्यांनी पदार्थांची चव घेताना, टेस्ट अप्रतिम असल्याचं सांगितलं. सोशल मीडियावर सुप्रिया पाठारे आणि लेक मिहीर पाठारे यांच्या हॉटेलचे अनेक फोटोस वाऱ्यासारखे पसरले असून त्यांच्या या फोटोसला चाहत्यांनी पसंती दर्शिविली आहे. शिवाय चाहत्यांकडून आणि खवय्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव ही होताना दिसतोय.