Priya Sachdev On Karisma Kapoor Children : बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरच्या पूर्वाश्रमीच्या पतीच्या निधनाने साऱ्यांना धक्का बसला.१२ जून रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. पोलो खेळ खेळताना त्यांच्या तोंडात मधमाशी गेली आणि श्वास घ्यायला त्रास झाल्याने त्यांनी जीव सोडला. करिश्मापासून घटस्फोटानंतर संजय यांनी प्रिया सचदेवशी लग्न केले. प्रिया सचदेव यांनी करिश्माच्या मुलांशी तिचे कसे नाते आहे याबाबत भाष्य केलं. तिने म्हटले होते की, ती कधीही करिश्माच्या मुलांची आई होऊ शकत नाही. प्रिया यांनी संजय आणि करिष्माच्या मुलांबाबत केलेलं भाष्य सध्या चर्चेत आलं आहे.
‘किन एंड काइंडनेस’ या युट्युब चॅनेलला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत प्रिया सचदेव यांनी संजय कपूर आणि करिश्मा कपूर यांच्या लग्नाविषयी भाष्य केले. तिने म्हटले होते की, संजयचे पूर्वीचे लग्न पारंपरिक विवाह नव्हते. त्या लग्नापासून त्यांना दोन सुंदर मुले होती. आम्ही त्यांच्यावर खूप प्रेम करतो आणि आज आम्ही एक सुंदर मिश्रण असलेलं कुटुंब आहोत”.
आणखी वाचा – “आम्हाला मरायची इच्छा नाही”, मढ-आयलँडमधील रस्त्याबाबत भडकला शशांक केतकर, म्हणाला, “निष्काळजीपणा आणि…”
प्रिया सचदेव यांनी पुढे मुलांबद्दल भाष्य केलं, ती म्हणाली, “आम्हाला चार मुले आहेत, समायरा, त्यानंतर सगळ्यात मोठी सफीरा, कियान, आणि माझा आणि संजयचा मुलगा अजारियास. हे एक मिश्रण असलेलं कुटुंब आहे. जेव्हा माझा मुलगा अझरियसचा जन्म झाला, तेव्हा तो एक दरवाजा होता ज्याने कुटुंबाला एकत्र आणले. तो आमच्या सगळ्यांच्या नात्याला एकत्र घेऊन आला. आमच्या दोन्ही मुली आम्हाला खूप जवळच्या आहेत. अधारा आणि सफिरा. आम्ही सर्व एकमेकांना प्रेम करतो आणि एकमेकांचे कौतुकही करीत असतो.
आणखी वाचा – ‘बिग बॉस’ फेम सना खानच्या आईचं निधन, पोस्ट शेअर करत दिली माहिती, म्हणाली, “तिने आजाराशी…”
प्रिया सचदेव यांनी करिश्मा कपूरच्या मुलांबद्दल सांगितले होते की ती त्यांच्या आईची जागा घेऊ शकत नाही, तरीही तिचे विशेष संबंध आहेत. संजय कपूरची तिसरी पत्नी म्हणाली, “मी कधीही त्यांची आई होऊ शकत नाही, परंतु मला माहित आहे की माझे जग आणि माझे हृदय कायम त्यांच्यात आहे. आम्ही सर्व प्रकारच्या मजेदार, हलके आणि गंभीर गोष्टी करतो. मी त्यांच्याशी जोडले गेले आहे”.





