Govinda Divorce News : गोविंदा आणि सुनीता आहुजा यांच्या नात्याबद्दल धक्कादायक बातम्या कानावर येत आहेत. हे जोडपे तब्बल ३७ वर्षानंतर घटस्फोट घेणार असल्याचं समोर आलं आहे. १९८७ मध्ये गोविंदा व सुनीता यांनी लग्नगाठ बांधली, आणि आता ते दोन मुलांचे पालक आहेत. पण आज अचानक समोर आलेल्या घटस्फोटाच्या बातम्यांमुळे सर्वांना धक्का बसला. मात्र याबाबत अधिकृत बातमी समोर आलेली नव्हती. अशातच आता सत्य काय आहे, ते ज्ञात झाले आहे. सुनिता आहुजा सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. अनेक धक्कादायक दाव्यांसह त्यांनी अनेक मुलाखतींमध्ये भाष्य केलं आहे.
आता घटस्फोटाच्या अहवालांदरम्यान, ‘इटाइम्स’ला जवळच्या एका कुटुंबीयांनी सांगितले की, “सुनीताने काही महिन्यांपूर्वी विभक्त होण्यासाठी नोटीस पाठविली होती पण त्यांनतर काहीही हालचाल पुढे झाली नाही”. त्याचवेळी, जेव्हा ‘इटाइम्स’ने गोविंदाचे व्यवस्थापक शशी सिन्हाशी संपर्क साधला, तेव्हा ते म्हणाले, “कुटुंबातील काही सदस्यांनी अशा गोष्टी बोलल्या आहेत, ज्यामुळे या जोडप्यात समस्या उद्भवल्या आहेत. याशिवाय आणखी काही नाही. गोविंदा एक चित्रपट बनवणार आहे, ज्यासाठी कलाकारही आमच्या कार्यालयात येत आहेत. आम्ही फक्त या प्रकरणाचे निराकरण करण्यात गुंतलो आहोत”.
त्याच वेळी, जेव्हा पोर्टलने गोविंदाशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी फक्त असे म्हटले आहे की, व्यवसायाशी निगडित चर्चा चालू आहेत. गोविंदा लवकरच नवाकोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येणार आहे. त्याच वेळी, सुनिता आहुजा यांनी संदेशाला प्रतिसाद दिला नाही. इतर अहवालानुसार, वारंवार भांडणामुळे ते घटस्फोट घेणार आहेत. इतकेच नव्हे तर ‘टाईम्स नाऊ’ आणि ‘टेली मसाला’ यांनी असा दावा केला आहे की अभिनेत्याचे ३० वर्षांच्या मराठी अभिनेत्रीशी प्रेम आहे.
काही काळापूर्वी, सुनिताने ‘हिंदी रश’ च्या मुलाखतीत खुलासा केला की ती आपल्या मुलांसमवेत स्वतंत्र अपार्टमेंटमध्ये राहतात आणि गोविंदाबरोबर राहत नाही. अभिनेता त्याच आसपासच्या एरियातील बंगल्यात राहतो. या मुलाखतीनंतर, ती शिर्डीला गेली तेव्हा ही पापाराझींनी त्यांना दोघांच्या नात्याबद्दल विचारले. यावर ती हसली आणि म्हणाली, “कोणाची हिंमत आहे का जो मला गोविंदापासून वेगळे करु शकेल. कोणीही आम्हाला वेगळे करु शकत नाही. मला त्याचा खूप आनंद आहे. असे लोक आहेत ज्यांना इतरांची घर तोडण्याची इच्छा आहे. मी कोणालाही माझं घर तोडू देणार नाही. मी जिंकेन कारण बाबा माझ्याबरोबर आहेत”.