छोट्या पडद्यावरील मालिका या घराघरातील प्रेक्षक आवर्जुन पाहतात. त्यातील अनेक मालिका अशा असतात, ज्या प्रेक्षकांच्या प्रेमामुळे टीआरपीच्या शर्यतीतही पुढे असतात. प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी निर्माते व दिग्दर्शक त्यात अनेक ट्विस्ट आणतात. पण जेव्हा मालिकेचे कथानक पूर्ण होण्याच्या दिशेने येते, तेव्हा साहजिकच ती मालिका प्रेक्षकांचा निरोप घेते. आता अशीच एक मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘सुंदरा मनामध्ये भरली’ ही मालिका आता बंद होणार असल्याची चर्चा आहे. मालिकेतील कलाकारांनी शेअर केलेल्या फोटोंनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. (Sundara Manamadhe Bharli)
एक वेगळ्या धाटणीचा विषय घेऊन छोट्या पडद्यावर आलेली ‘सुंदर मनामध्ये भरली’ मालिका गेली अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. लतिका व अभिमन्यू यांची ही अनोखी प्रेमकहाणी प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. मात्र, अभ्याचा मृत्यू, पुढे आदिराच्या एन्ट्रीसह मालिकेने काही वर्षांचा गॅप घेतला होता. त्यानंतर लतिकाच्या आयुष्यात देवा आला आणि तिच्या या प्रवासात नव्या जोडीदाराची साथ मिळाली. आता लतिका आणि देवा विवाहबंधनात अडकणार असून या कथेसह ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे बोलले जात आहे.
हे देखील वाचा – “बचेंगे तो ओर भी लढेंगे” वडिलांचा अपघात आणि अक्षयाची धीर देणारी पोस्ट
मालिकेच्या शेवटच्या भागाची शूटिंग सध्या सुरु असून मालिकेतील कलाकारांनी सोशल मीडियावर स्टोरीज शेअर करत ही माहिती दिली आहे. मालिकेतील लतिका आणि देवा म्हणजे अभिनेत्री अक्षया नाईक व अभिनेता कुणाल धुमाळ यांनी शूटिंगच्या शेवटच्या दिवसाचे फोटो त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंट्सद्वारे शेअर केले आहेत. अभिनेत्री अक्षया नाईक ज्यामध्ये म्हणते, “One last time !!! Today is the last day of shoot in Madh of our show Sundara Manamadhe Bharali! PS: tomorrow is officially last (but not on our everyday set)”. तर कुणाल धुमाळ त्याच्या स्टोरीला कॅप्शन देत म्हणतो, “Last Day”.
हे देखील वाचा – छोट्या पडद्यावर किरण मानेंचं कमबॅक, ‘सिंधुताई माझी माई’ मालिकेत झळकणार, म्हणाले, “आपल्या भूमिकेतून…”
दरम्यान, ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असली तरी, त्याजागी कोणती मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. पण लतिका आणि देवाच्या जोडीला प्रेक्षक नक्कीच मिस करणार आहेत. (Sundara Manamadhe Bharli goes off-air)