मराठी मनोरंजनसृष्टीतील अशा बऱ्याच मालिका आहेत ज्यांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला. तरीही त्यांची कथानक नेहमी प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिली. तशीच एक ‘कलर्स मराठी’वरील लोकप्रिय मालिका म्हणजे ‘सुंदरा मनामध्ये भरली’. कित्येक वर्षांपासून या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. मालिकेतील अभी व लतिकाच्या जोडीला तर प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर उचलून घेतलं. अभि हे पात्र साकारणारा समीर परांजपे आणि लतिका म्हणजे अक्षया नाईक यांनी आपल्या अभिनयातून प्रेक्षकांना आपलंस केलं. त्याचा बराच मोठा चाहतावर्ग आहे. ते दोघं सोशल मीडियावर सक्रिय असतात. नुकतीच अक्षयाने खास समीरसाठी एक पोस्ट शेअर करत त्याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. (Akshaya naik share a birthday post for Sameer paranjape)
अक्षयाने समीरबरोबरचा एक खास फोटो शेअर केला आहे. त्या फोटोला कॅप्शन देत ती लिहीते, “या भोळ्या चेहऱ्यामागचा सैतान फक्त मला माहित आहे. याचा अभिमान बाळगू की माझं दूर्दैव समजू हे मला कधीच कळलं नाही. मित्र म्हणून तू मला जितका त्रास देतो, त्याची भरपाई तू तुझ्या उत्तम अभिनयातून आणि आता गायकीतून करत आहे”.
ती पुढे लिहीते, “मित्र म्हणून तुला बघता क्षणी जितक्या तोंडात शिव्या येतात, तितकाच तुला कला सादर करताना पाहून मला अभिमानही वाटतो. तू आपला हिरो आहेस. माझे सगळे लाड पुरवण्यासाठी धन्यवाद नाही म्हणणार. तुझी अतिरिक्त जबाबदारी आहे असं समज आणि आवश्यक ते कर. वाढदिवसाच्या शुभेच्छा चुडू !” हे कॅप्शन लिहीत तिने एक छान हॅशटॅगही दिला.
आणखी वाचा – अमेरिकेत स्थायिक झालेल्या प्रियांका चोप्राने विकलं मुंबईतील घर, एकूण किंमत आहे…
या पोस्टवर कमेंट करत समीरनेही हटके अंदाजात आभार मानले आहेत. तो कमेंट करत लिहीतो, ‘टुडे भेटच आता. फारच गोड लिहिलं आहेस. आता भेटून एक कारल्याचा डोस देतोच. खूप प्रेम’. असं लिहीत त्याने शुभेच्छांसाठी आभार मानले आहेत. या पोस्टवर नेटकऱ्यांसह कलाकारांनीही लाईक व कमेंटचा वर्षाव केला आहे. अभिनेत्री सुरभी भावे लिहीते, ‘हा सैतान थोडा फार मला पण माहीत आहे. पण याच्या खोड्यांचा कधीच राग येत नाही हे वैशिष्ट्य’ असं लिहीत तिने ‘खूप सारं प्रेम भावा’ अशी कमेंट केली आहे.