छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘सुखं म्हणजे नक्की काय असतं’ प्रेक्षकांमध्ये चांगलीच चर्चेत असते. ही मालिका टीआरपी यादीत कायम टॉप ५ मध्ये असते. यातील प्रत्येक पात्र चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. मालिकेतील प्रत्येक पात्रावर चाहते भरभरुन प्रेम करतात. या मालिकेतील नायिका जेवढी गाजली. तेवढीच गाजली ती मालिकेची खलनायिका माधवी निमकर. माधवी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर ती आपले अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. तिच्या या फोटो व व्हिडीओला चाहत्यांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळतो. चाहत्यांबरोबर संपर्कात राहण्यासाठी माधवी अभिनय क्षेत्रासह वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टीही शेअर करत असते.
माधवी अभिनय करण्याबरोबरच तिच्या फिटनेसचीही तितकीच काळजी घेते. ती तिच्या योगाचे व व्यायामाचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते आणि तिच्या या फोटो व व्हिडीओला चहाते लाईक्स व कमेंट्स करत प्रतिसाद देत असतात. अशातच तिने नुकताच शेअर केलेला एक व्हिडीओ चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. माधवीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे बाबांच्या वाढदिवसानिमित्त खास व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओमध्ये तिने बाबांचा वाढदिवस कसा साजरा केला यांची खास झलक दाखवली आहे.
या व्हिडीओमध्ये माधवी एका मोठ्या हॉटेलमध्ये बाबांचा वाढदिवस साजरी करताना दिसत असून यावेळी तिने बाबांच्या वाढदिवशी केक कापला असून त्यानी डोक्यावर वाढदिवसाची टोपीदेखील परिधान केली आहे. यावेळी माधवीच्या आई-वडिलांसह तिचा भाऊ व वहिनीदेखील उपस्थित होते. वाढदिवसाचे औचित्य साधत माधवीने तिच्या बाबांबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यामध्ये तिने असं म्हटलं आहे की, “काल बाबांचा वाढदिवस झाला. आषाढी एकादशी खुप चांगली साजरी झाली. आपलं दु:ख, त्रास, बाजूला ठेऊन, तडजोड करुन नेहमी आनंद दिलात. जेवढ करता आलं. तेवढ सगळं केलत. आता तोच आनंद तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न मी करत्ये आणि करत राहिन”.
आणखी वाचा – रीलच्या नादात आयुष्य गमावलं, ३०० फूट खोल दरीत कोसळल्याने प्रसिद्ध इन्फ्ल्युएन्सरचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
यापुढे तिने असं म्हटलं आहे की, “दादा आणि वहिनी माझ्याबरोबर आहेच. आजही आई व बाबा यांची साथ मला आणि दादाला मिळत आहे यासाठी मी देवाची खुप आभारां आहे”. दरम्यान, माधवीने शेअर केलेल्या या व्हिडीओला अनेक कलाकारांनी व चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसेच माधवीच्या बाबांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.