बॉलिवूड अभिनेत्रींच्या यादीत प्रियांका चोप्रा हे नाव नेहमीच चर्चेत असलेलं पाहायला मिळालं आहे. काही दिवसांपूर्वीचं प्रियांका अनंत अंबानी यांच्या लग्नसाठी नवरा व लेकीसह भारतात आली. आज प्रियांकाचा वाढदिवस आहे. आणि अभिनेत्रीच्या वाढदिवसानिमित्त तिच्या चाहत्यांनी आणि लोकांनी तिला अनेक शुभेच्छा दिल्या आहेत. परंतु यादरम्यान निक जोनासची पोस्ट सर्वात खास आहे. अभिनेत्रीचा पती व हॉलिवूड गायक अभिनेता निक जोनास यानेही आपल्या पत्नीवर खूप प्रेमाचा वर्षाव केला आहे. (Priyanka Chopra Birthday)
निकने प्रियांकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत तिचे काही जबरदस्त फोटो शेअर केले आहेत. याचबरोबर एक खास संदेशही दिला आहे. निकच्या पत्नीसाठी केलेल्या या पोस्टवर चाहत्यांनी हार्ट इमोजी शेअर केली आहे. निकने इन्स्टाग्रामवर प्रियांकाचे चार फोटो शेअर केले आहेत आणि कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, “मी खूप भाग्यवान आहे की तुझ्यासारखी स्त्री माझ्या आयुष्यात आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या प्रिये”.
पहिल्या फोटोमध्ये प्रियांका पिवळ्या स्विमसूटमध्ये पूलमध्ये दिसत आहे. तर दुसऱ्या छायाचित्रात ती निक जोनासबरोबर समुद्राच्या किनाऱ्यावर दिसत आहे आणि दोघेही एकमेकांना किस करताना दिसत आहेत. तिसऱ्या फोटोमध्ये ती उन्हात सोफ्यावर बसून हिरव्या रंगाच्या पोजमध्ये पोज देताना दिसत आहे आणि चौथ्या फोटोमध्ये मावळतीच्या संध्याकाळचे सुंदर दृश्य आहे आणि दोघेही हात धरुन एकमेकांकडे बघताना दिसत आहेत. या फोटोंवर लोकांनी खूप कमेंट्सही केल्या आहेत.
प्रियांका चोप्रा व निक जोनास ‘मेट गाला २०१७’ या भव्य कार्यक्रमात भेटले होते. २०१८ मध्ये उदयपूरच्या उम्मेद भवन पॅलेसमध्ये दोघांचे लग्न झाले. जानेवारी २०२२ मध्ये त्यांना सरोगसीद्वारे मालती मेरी ही मुलगी झाली. त्यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर प्रियांका चोप्रा बॉलीवूड तसेच हॉलिवूड चित्रपट व वेबसीरिजमध्ये दिसली आहे. सध्या ती ‘द ब्लफ’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. निक जोनासचा चित्रपट ‘द गुड हाफ’ २३ जुलै (अमेरिका) आणि २५ जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे.